B.Tech अन्‌ MBA उत्तीर्णांसाठी ITI लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी!
B.Tech अन्‌ MBA उत्तीर्णांसाठी ITI लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी! Sakal
एज्युकेशन जॉब्स

B.Tech अन्‌ MBA उत्तीर्णांसाठी ITI लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी!

सकाळ वृत्तसेवा

ITI लिमिटेडने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे.

सोलापूर : जर तुमच्याकडे B.Tech किंवा MBA पदवी असेल तर तुमच्यासाठी आयटीआय लिमिटेडमध्ये (ITI Limited) नोकरीची (Jobs) चांगली संधी आहे. ITI लिमिटेडने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत मुख्य व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक, मुख्य वित्त व्यवस्थापक / वित्त व्यवस्थापक / सहाय्यक वित्त व्यवस्थापक या पदांची भरती (Recruitment) करण्यात येत आहे.

एकूण 41 पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी @itiltd.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्‍यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2021 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

  • मुख्य व्यवस्थापक / व्यवस्थापक (श्रेणी VI / V) : या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड कम्युनिकेशन / इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि इलेक्‍ट्रिकलमध्ये 60 टक्के गुणांसह B.Tech पदवी घेतलेले असावेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 60 टक्‍के गुण असणे आवश्‍यक आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याशिवाय राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 58 टक्के गुण असणे आवश्‍यक आहे.

  • मुख्य व्यवस्थापक : डेटा सेंटर अँड सेल्स मार्केटिंग ग्रेड - VI या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केलेले असावेत. याशिवाय उमेदवारांनी एमबीए मार्केटिंगही केलेले असावे.

  • उपव्यवस्थापक : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकीमध्ये 60 टक्के गुण असावेत. याशिवाय एससी, एसटी, पीडब्ल्यूडीमध्ये 58 टक्के गुण असावेत. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

या तारखा लक्षात ठेवा...

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2021

  • अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख : 29 नोव्हेंबर 2021

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT