संघर्षाचे व्यवस्थापन sakal
एज्युकेशन जॉब्स

संघर्षाचे व्यवस्थापन

सकाळ वृत्तसेवा

चांगल्या आणि वाईटातला संघर्ष असे मुळीच नाही. व्यवसायात, कंपनीत नवीन आणि जुन्या पिढीतील संघर्ष, तंत्रज्ञान वापरातील संघर्ष, वेतनातील फरकाबाबत संघर्ष, अधिकाराच्या कक्षेबाबत संघर्ष, जबाबदारीबाबत संघर्ष असे अनेक प्रकारचे अंतर्गत संघर्ष आढळून येतात. असे संघर्ष व्यक्ती आणि गटांमध्ये आढळतात. भीती, अप्रामाणिकपणा, टाळाटाळ, गैरसमज, गुप्त योजना, बदला, निर्णय घेण्यास घाई, संयमाचा अभाव ही त्याची कारणे असू शकतात.

‘कंपनीअंतर्गत संघर्ष’ वेळेवर आणि काळजीपूर्वक सोडविले गेले नाहीत, तर वेळेचा अपव्यय, कामाचा खोळंबा, हातातील काम निघून जाणे, कमी दर्जाचे किंवा कमी प्रमाणात (अथवा दोन्ही) काम होणे, कर्मचाऱ्यांचा मनापासून सहभाग नसणे, टीमवर्क न होणे, हे धोके उद्‌भवतात. याउलट जर या संघर्षांचे योग्य व्यवस्थापन केले, तर मोठा संघर्ष टळणे, नवीन माहिती आणि उपाययोजना समजणे, नाती बळकट होणे, सुसंवाद वाढीस लागणे, हे फायदे होतात.

कंपनी अंतर्गत संघर्षाकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन आहेत

रूढिवादी दृष्टिकोन : पूर्वी सर्व कंपनीअंतर्गत संघर्षांना चुकीचे आणि वाईट मानले जायचे. त्यांना टाळले जायचे. अत्यंत कडकपणे त्यावर कारवाई केली जायची.

मानवी संबंधकेंद्री दृष्टिकोन : या दृष्टिकोनानुसार संघर्ष ही कंपनी अथवा गटातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिच्याकडे वाईट भावनेने न पाहता, योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. तिचा कंपनीची कामगिरी वाढविण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.

परस्परसंवादी दृष्टिकोन : यात जाणूनबुजून सकारात्मक संघर्ष निर्माण केले जातात. ते सुसंवादी, शांततापूर्ण, सहकार्यात्मक ठेवले जातात. बदलांना गटांनी आणि व्यक्तींनी नेहमी तयार राहावे, स्थिर-उदासीन-प्रतिसाद न देणारे बनू नये, यासाठी हे केले जाते. स्वपरीक्षण आणि सर्जनशीलता यांची यामार्फत वाढ करून कंपनी प्रगतिपथावर ठेवण्यासाठी याचा वापर होतो.

सर्व संघर्षांना नेहमीच सकारात्मक मात्र मानले जात नाही.

कंपनीअंतर्गत संघर्षाची प्रक्रिया ही चार टप्प्यांत होते

संभाव्य विरोध : या टप्प्यात संघर्षाची बीजे रोवली जातात. संघर्षास पूरक वातावरण तयार होते. यातून संघर्ष होईलच असे नाही; पण तशी शक्यता तयार होते. रचनेतील, संवादातील अथवा वैयक्तिक विसंवादातून हा टप्पा तयार होतो.

अनुभूती आणि वैयक्तिकीकरण : जर पहिल्या टप्प्यातील बीजामुळे कोणा व्यक्ती अगर गटाच्या कामावर, हितसंबंधावर, परिस्थितीवर नकारात्मक प्रभाव पडत असेल तर ती बाब वैयक्तिक पातळीवर भावनिकपणे घेतली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष संघर्षास सुरुवात होते.

वर्तणूक : संघर्षामुळे प्रत्यक्ष वर्तणुकीत बदल होतो. परस्परसंबंधात बदल होतो. आक्रमकता, हिंसा याकडे मार्गक्रमण सुरू होते.

निष्पत्ती किंवा परिणाम : नेतृत्वाने संघर्ष कसा हाताळला यावर आधारित चांगला किंवा वाईट परिणाम प्रत्यक्ष दिसू लागतो. स्पर्धा, सहयोग, तडजोड, दुर्लक्ष, सामावून घेणे यापैकी कोणत्याही मार्गाने संघर्ष हाताळला जाऊ शकतो. संघर्ष हा व्यवसायाचाच नव्हे, तर जीवनाचा अविभाज्य आणि अमर्त्य घटक असल्याने, ‘कंपनीअंतर्गत संघर्ष’ नष्ट करण्यापेक्षा त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यावर भर असावा. त्याचा कंपनीस फायदा कसा होईल हे पाहावे.

-जगदीश पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT