Teacher Eligibility Test esakal
एज्युकेशन जॉब्स

'TET' परीक्षाही पुढे ढकलणार; सरकारकडून आज अंतिम घोषणेची शक्यता!

तात्या लांडगे

'न्यासा' ही कंपनी मान्यताप्राप्त असून त्याच कंपनीच्या माध्यमातून सावर्जनिक आरोग्य विभागाची परीक्षा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

सोलापूर : 'न्यासा' ही कंपनी मान्यताप्राप्त असून त्याच कंपनीच्या माध्यमातून सावर्जनिक आरोग्य विभागाची परीक्षा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रद्द झालेली ही परीक्षा आता 24 ऑक्‍टोबर व 31 ऑक्‍टोबरला घेतली जाणार आहे. त्यासाठी 31 ऑक्‍टोबरला होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) Teacher Eligibility Test 2021 पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून त्याची अंतिम घोषणा आज (बुधवारी) होणार आहे. आरोग्य विभागाची परीक्षा (Health Department Exam) तीन टप्प्यात घेण्याचे नियोजन केल्याचे विश्‍वसनिय सूत्रांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व ड प्रवर्गातील सहा हजार 191 रिक्‍त पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये गट 'क'अंतर्गत दोन हजार 725 तर गट 'ड'तीन हजार 466 पदांचा समावेश आहे. त्यासाठी राज्यभरातून आठ लाख 66 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी 'न्यासा' या कंपनीची निवड करण्यात आली आहे. मात्र, प्रवेश पत्रातील गोंधळामुळे ती परीक्षा रद्द करावी लागली. त्यानंतर आता भरतीतील वशिलेबाजीच्या ऑडिओ क्‍लिप बाहेर आल्याने विरोधकांसह उमेदवारांनी त्या क्‍लिपची 'एसआयटी'मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तरीही, ही परीक्षा त्याच कंपनीच्या माध्यमातून होईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, त्या ऑडिओ क्‍लिपची चौकशी केली जात असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा 24 व 31 ऑक्‍टोबरला होईल. परीक्षेचे तीन टप्पे केले असून 'टीईटी' पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. ती परीक्षा पुढे न गेल्यास 31 ऑक्‍टोबरऐवजी त्या दिवशीची परीक्षा त्याच्या पुढील रविवारी होऊ शकते. परंतु, त्यावर आज (बुधवारी) अंतिम निर्णय होईल.

- डॉ. सतीश पवार, संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन, मुंबई

परीक्षेचे असे आहे नियोजन

- गट 'क' पहिला टप्पा : पदवी व त्यापुढील साडेतीन लाख उमेदवारांची परीक्षा 24 ऑक्‍टोबरला

- गट 'क' दुसरा टप्पा : दहावी-बारावी उत्तीर्ण सव्वालाख उमेदवारांची 31 ऑक्‍टोबरला सकाळच्या सत्रात परीक्षा

- गट 'ड' तिसरा टप्पा : साडेचार लाख उमेदवारांची 31 ऑक्‍टोबरलाच दुपारच्या सत्रात होईल परीक्षा

संस्था बदलल्यास पुढच्या वर्षीच पदभरती

'न्यासा' या संस्थेची संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी झाली असून मान्यताप्राप्त असल्यानेच त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती सोपविली आहे. तरीही, विरोधकांच्या मागणीनुसार संस्था बदलण्याचा निर्णय घेतल्यास ही परीक्षा किमान तीन महिने पुढे ढकलावी लागेल. परंतु, उमेदवारांची मागणी आणि सावर्जनिक आरोग्य विभागाची गरज लक्षात घेऊन ही परीक्षा त्याच संस्थेमार्फत घेतली जाणार आहे. परंतु, त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण राहील, असेही सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT