how to make career in sports psychology in india nagpur news 
एज्युकेशन जॉब्स

'स्पोर्ट्स सॉयकॉलॉजी'मध्ये करिअर करा अन् महिन्याला कमवा २ लाखांपर्यंत पगार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : खेळाडूला खेळण्यासोबतच मानसिकरित्या स्वस्थ राहणे देखील गरजेचे आहे. शारीरिकरित्या जितके तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे तितकेच मानसिकरित्या देखील तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. यामध्ये खेळाडूची मदत करतात ते स्पोर्ट्स सॉयकॉलॉजीस्ट. यामध्ये त्यांचे दोन काम  असतात. सॉयकॉलॉजीस्ट या क्षेत्रामध्ये संबंधित खेळांवर रिसर्च करतात, नाहीतर कोणत्या खेळाडूचा कोच बनतात. हेच कोच वेगवेगळ्या थेरपी, काउंसलिंग, मानसिक अभ्यास, तसेच काही औषधांच्या सहाय्याने खेळाडूंची मदत करतात.

कसे घडवाल करिअर?
स्पोर्ट्स सॉयकॉलॉजी एक विशेष ब्रांच आहे. बीए सॉयकॉली किंवा बीएससी केल्यानंतर मास्टर किंवा डॉक्टरेट स्तरावर तुम्ही हा कोर्स करू शकता. बॅचलर भारतामधून पूर्ण करू शकता. मात्र, मास्टर करायचे असेल तर विदेशात जावे लागेल. तुम्ही प्रोफेशन म्हणून देखील हा कोर्स करू शकता. त्यासाठी तुम्हाला असोसिएशन फॉर अप्लाइड स्पोर्ट्स सॉयकॉलॉजी मध्ये नोंदणी करावी लागेल. ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून तुम्हाला सर्टीफिकेट दिले जाते.

भारतातील महत्व -
भारतामध्ये खेळांना अधिक महत्व दिले जाते. क्रिकटे, बॅडमिंटन, टेनिस हे लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांची गरज असते. आपल्या देशात आता देखील अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशातून स्पोर्ट्स सॉयकॉलॉजीस्टला आणले जाते. त्यामुळे आपल्या देशातील तरुणांनी यामध्ये करिअर केले तर नक्कीच त्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. 

किती मिळतो पगार? -
सुरुवातीला सॅलरी फार कमी असते. सहा हजारापासून तर पंधरा हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो. मात्र, अनुभव वाढला की पगार देखील वाढतो. तुम्ही प्रोफेशनल म्हणून या फिल्डमध्ये करिअर करू इच्छित असाल, तर प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये कमवू शकता.

याठिकाणी करा कोर्स -

  • दिल्ली विद्यापीठातून बीए सॉयकॉलॉजी करू शकता.
  • राजस्थान विद्यापीठातून बीएससी सॉयकॉलॉजी करता येईल.
  • जामिया मिलिया विद्यापीठातून बीए सॉयकॉलॉजी करू शकता. 
  • कोलकाता विद्यापीठातून बीए/बीएससी सॉयकॉलॉजी आणि एमए/एमएससी अप्लाइड सॉयकॉलॉजी करू शकता.
  • गुरु नानक देव विद्यापीठातून एमएससी स्पोर्ट्स सॉयकॉलॉजी आणि एमए स्पोर्ट्स सॉयकॉलॉजी करता येईल.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT