Caste Certificate Online Process esakal
एज्युकेशन जॉब्स

Caste Certificate Online : घरबसल्या झटपट मिळवा जात प्रमाणपत्र; ऑनलाईन अर्ज करण्याची एकदम सोपी प्रोसेस, एका क्लिकवर..

Caste Certificate Online Process : आता जात प्रमाणपत्रासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुमच्या राज्याच्या पोर्टलवरून घरबसल्या ऑनलाईन अर्ज करा आणि प्रक्रिया सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता.

Saisimran Ghashi

Caste Certificate Online Process : सरकारी नोकऱ्या, स्पर्धा परीक्षा किंवा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना जात प्रमाणपत्र असणे अत्यावश्यक असते. पूर्वी या प्रमाणपत्रासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असत मात्र आता “डिजिटल इंडिया” मोहिमेमुळे ही प्रक्रिया घरबसल्या करता येते. केंद्र सरकारने अलीकडेच जातीनिहाय जनगणनेला मान्यता दिली आहे त्यामुळे अनेक शासकीय कामकाजांसाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य होण्याची शक्यता आहे. अशा वेळी हे प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध असणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

पूर्वी प्रमाणपत्रासाठी रांगेत तासन्‌तास थांबावे लागत होते पण आता ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन झाली आहे. तुम्ही भारतातील कोणत्याही राज्यात राहत असाल तरीही आपल्या राज्याच्या अधिकृत पोर्टलवर जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

जर तुम्हाला राज्याचे पोर्टल माहित नसेल तर http://services.india.gov.in/ या राष्ट्रीय सेवा पोर्टलवर “Caste Certificate” असे शोधा. तेथे तुम्हाला तुमच्या राज्याची योग्य लिंक मिळेल.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर खालीलप्रमाणे नोंदणी करा-

  1. “New User Registration” किंवा “नवीन वापरकर्ता नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.

  2. तुमचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पत्ता आणि आधार क्रमांक भरा.

  3. मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP द्वारे खात्री करा.

  4. यूजर आयडी आणि पासवर्ड सेट करा.

नोंदणी पूर्ण झाल्यावर पोर्टलवर लॉगिन करा आणि “Caste Certificate” या सेवेसाठी अर्ज सुरू करा.

कोणासाठी उपयुक्त?

ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना तसेच सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. एकदा का तुम्ही जात प्रमाणपत्र मिळवले, की सरकारी योजना, अनुदान, आरक्षण इ. बाबींसाठी अर्ज करणे सुलभ होते.

डिजिटल इंडिया अंतर्गत ही सुविधा सुरु झाल्यापासून जात प्रमाणपत्रासाठीची धावपळ संपली आहे. घरी बसून, फक्त काही स्टेप्स फॉलो करून हे प्रमाणपत्र मिळवता येते. सरकारी कार्यालयात जाणे, रांगा लावणे, एजंटचा खर्च करणे याला पूर्णविराम मिळाला आहे. म्हणूनच, वेळ वाया घालवू नका. आजच तुमच्या राज्याच्या पोर्टलवर जा आणि तुमचे जात प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रदर्शित होण्यापूर्वीच 'खलिद का शिवाजी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात ! पुण्यात प्रदर्शित होणार नाही

दादा एक गुड न्यूज आहे फेम अभिनेत्याचं दिग्दर्शनात पदार्पण; मुंबईत पार पडणार महापूर नाटकाचा शुभारंभ

Video: मद्यधुंद पोलिस निरीक्षकाचा भररस्त्यात तमाशा; लोक म्हणाले, दोन पावले चालून दाखवा अन् पुढं जे घडलं... व्हिडिओ व्हायरल

PMPML Bus: डबलडेकरचा प्रायोगिक ‘प्रवास’; ‘आयटी पार्क’ परिसरात मार्गांचे लवकरच होणार सर्वेक्षण

Viral Post: व्हिसा मंजूर!' पण आधी 'या' 9 प्रश्नांची तयारी करा; स्टार्टअप संस्थापकाने दिले टिप्स

SCROLL FOR NEXT