IB Recruitment 2023 eSakal
एज्युकेशन जॉब्स

IB Recruitment 2023 : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, आजपासून भरता येणार फॉर्म; वाचा सविस्तर

Government Jobs : 13 नोव्हेंबरपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.

Sudesh

गृह मंत्रालयाच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. आयबीमध्ये विविध पदांवर बंपर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. 13 नोव्हेंबरपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.

IB मध्ये एकूण 677 पदांवर भरती होणार आहे. यांपैकी सिक्युरिटी असिस्टंट/मोटर ट्रान्सपोर्ट या पदासाठी 362 जागा असणार आहेत. तर 315 जागा एमटीएस पदासाठी आहेत. आजपासून (14 ऑक्टोबर) अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

किती आहे फी?

ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर, एससी/एसटी/पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी 50 रुपये शुल्क असणार आहे. 13 नोव्हेंबर नंतर येणारे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

असा करा अर्ज

यासाठी सर्वात आधी उमेदवारांना mha.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यानंतर होमपेजवर असणाऱ्या IB या पर्यायावर क्लिक करा. यानंतर नवीन पेजवर स्वतःला रजिस्टर करुन, लॉगइन आयडी आणि पासवर्ड जनरेट करावे लागेल.

लॉगइन केल्यानंतर अर्जामधील माहिती भरावी लागेल. त्यानंतर आपला फोटो, सही आणि इतर डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. यानंतर अर्जाचे शुल्क भरून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT