CS Exam
CS Exam Esakal
एज्युकेशन जॉब्स

"आयसीएसआय'ने दिली कंपनी सेक्रेटरी जून परीक्षांसाठी पुन्हा संधी ! जाणून घ्या सविस्तर

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कंपनी सेक्रेटरीच्या (Company Secretary) विविध अभ्यासक्रमांसाठी जून 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याच्या कोणत्याही कारणास्तव तुम्ही वंचित राहिल्यास, ही बातमी तुमच्यासाठी पुन्हा एक संधी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) (Institute of Company Secretary of India) ने विद्यार्थ्यांना जून 2021 मध्ये होणाऱ्या फाउंडेशन, एक्‍झिक्‍युटिव्ह आणि प्रोफेशनल कोर्सेसच्या परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म भरण्याची संधी जाहीर केली आहे. (ICSI gives company secretary re-opportunity for June exams)

संस्थेने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, सीएस जून 2021 परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 15 मे रोजी पुन्हा एकदा विंडो ओपन होणार आहे. उमेदवार 22 मे रोजी रात्री 11.59 पर्यंत अर्ज सादर करू शकतील. याआधी सीएस जून 2021 च्या फाउंडेशन, एक्‍झिक्‍युटिव्ह आणि प्रोफेशनल अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी 31 मार्चपर्यंत विना विलंब शुल्क आणि 9 एप्रिलपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्यात आले होते.

सीएस जून परीक्षा सध्या पुढे ढकलल्या आहेत, नवीन तारखांची नंतर घोषणा होईल

आयसीएसआयने कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे जून 2021 च्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. 1 जून ते 10 जून या कालावधीत या परीक्षा घेण्यात येणार होत्या. संस्थेने जारी केलेल्या नोटीसमध्ये सीएस जून परीक्षेसाठी कोणत्याही नवीन तारखांची घोषणा अद्याप झालेली नाही. कोव्हिड-19 च्या सर्व देशभरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयसीएसआय सीएस सुधारित जून 2021 चे वेळापत्रक जारी करण्याची शक्‍यता आहे.

उच्च शिक्षणावर आधारित अतिरिक्त मॉड्यूल्स आणि सवलत जोडण्याची संधी

आयसीएसआयने जून 2021 सीएस परीक्षांसाठी अर्ज विंडो पुन्हा उघडण्याची तसेच यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा फॉर्ममध्ये अतिरिक्त मॉड्यूल जोडण्याची संधी दिली आहे. इच्छुक उमेदवार परीक्षा पोर्टलमध्ये लॉग इन करून परीक्षा फॉर्ममध्ये सुधारणा करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT