IGNOU Canva
एज्युकेशन जॉब्स

'इग्नू'ने केला बीएड प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर! 'या' लिंकवरून पाहा निकाल

'इग्नू'ने केला बीएड प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर! 'या' लिंकवरून पाहा निकाल

श्रीनिवास दुध्याल

उमेदवार इग्नूच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकवरून त्यांचा प्रवेश परीक्षेचा निकाल तपासू शकतात.

सोलापूर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (Indira Gandhi National Open University) (IGNOU) जानेवारी / जुलै 2021 सत्राच्या बीएड प्रवेश परीक्षेचा (BEd entrance test) निकाल जाहीर केला आहे. मंगळवार, 6 जुलै रोजी हा निकाल विद्यापीठातर्फे अधिकृत संकेतस्थळ ignou.ac.in वर जाहीर करण्यात आला. इग्नूच्या बीएड अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेस हजेरी लावणारे उमेदवार इग्नूच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकवरून त्यांचा प्रवेश परीक्षेचा निकाल तपासू शकतात. (IGNOU announces results of BEd entrance exam)

इग्नू बीएड प्रवेशाचा निकाल 2021 तपासण्यासाठी https://studentservices.ignou.ac.in/Openmat/BED2021/BEd_Entrance_Res2021.asp या लिंकवर क्‍लिक करा.

असा चेक करा निकाल

इग्नू बॅचलर ऑफ एज्युकेशन (बीएड) प्रवेश परीक्षेस हजेरी लावणारे उमेदवार विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन त्यांचा निकाल आणि गुणांची तपासणी करू शकतात. वेबसाईटच्या मेन पेजच्या अलर्ट विभागात दिलेल्या बीएड निकालाशी संबंधित लिंकवर क्‍लिक करा. त्यानंतर पुन्हा "लिंक फॉर बीएड'वर क्‍लिक करा. मग आपला नोंदणी क्रमांक नवीन पेजवर सबमिट करा. त्यानंतर उमेदवारांना त्यांचा इग्नू बीएड प्रवेशाचा निकाल 2021 आणि स्क्रीनवर गुण पाहता येईल.

जानेवारी सत्रासाठी समुपदेशन लवकरच होईल सुरू

बीएड प्रवेश परीक्षेसंदर्भातील निकालांबरोबरच इग्नूने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, बीएड प्रोग्राममध्ये जानेवारी 2021 च्या सत्रात प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेच्या आधारे यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांचे समुपदेशन लवकरच सुरू केले जाईल. बीएड प्रवेशासाठी समुपदेशन प्रक्रिया इग्नूद्वारे प्रादेशिक केंद्राद्वारे पूर्ण केली जाईल. उमेदवारांना त्यांच्या संबंधित प्रदेश किंवा क्‍लस्टरसाठी तयार केलेल्या गुणवत्ता यादी / क्रमांकानुसार समुपदेशनासाठी आमंत्रित केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीन अन् रशियाकडून अणुचाचण्या सुरु असल्याचा ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानचंही घेतलं नाव, चीनकडून प्रत्युत्तर

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Dev Deepawali 2025 Travel Tips : देव दिवाळीला वाराणसीला जाऊ शकत नाही? मग भेट द्या 'या' अद्भुत ठिकाणांना

Mumbai Metro: भुयारी मेट्रोला उदंड प्रतिसाद! महिनाभरात ३८ लाख मुंबईकरांचा प्रवास

Nashik Cctv Network : सिंहस्थ अवघ्या दीड वर्षांवर; पण नाशिकचा 'तिसरा डोळा' बंदच! १० वर्षांनंतरही सीसीटीव्हीचे जाळे अपूर्ण

SCROLL FOR NEXT