Indian Institute of Technology-Kharagpur Google
एज्युकेशन जॉब्स

IIT खरगपूरमध्ये विक्रमी प्लेसमेंट; विद्यार्थ्याला 2.40 कोटींच पॅकेज

सकाळ डिजिटल टीम

IIT Placement 2021 : यंदा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) प्लेसमेंट 2021 सीझनमध्ये मिळालेल्या नोकरीच्या ऑफर्सनी गेल्या अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत. IIT खरगपूरला तिसऱ्या दिवशी 1100 पेक्षा जास्त प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूरने (Indian Institute of Technology-Kharagpur) शनिवारी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी आयआयटीच्या इतिहासात सर्वाधिक प्लेसमेंट ऑफर मिळवल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वाधिक वार्षिक पॅकेज हे 2-2.40 कोटी रुपये इतके मिळाले आहे.

IIT-खरगपूरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल 1,100 हून अधिक प्लेसमेंट ऑफर मिळाल्या असून एका निवेदनात दिलेल्या माहितीमधून संस्थेंने ही माहिती दिली आहे. मागच्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या काळात देखील IIT-खरगपूरला मिळालेल्या प्री-प्लेसमेंट ऑफर (Pre Placement Offers) या भारतातील इतर सर्व टॉपच्या शैक्षणिक संस्थांमध्ये मिळालेल्या ऑफर्समध्ये सर्वात जास्त आहेत.

संस्थेने सांगितले की, आतापर्यंत त्यांना 1 कोटींहून अधिकच्या पॅकेजच्या 20 हून अधिक ऑफर मिळाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना भरती करुन घेणाऱ्यांमध्ये क्वालकॉम, मायक्रोसॉफ्ट, गुगल, उबेर, इंटेल, अमेरिकन एक्सप्रेस, हनीवेल, सॅमसंग आणि आयबीएम सारख्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे. IIT खरगपूरच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्व क्षेत्रातील 100 हून अधिक कंपन्यांनी भरती प्रक्रियेत भाग घेतला, ज्यात सॉफ्टवेअर, अनालिटिक्स, कंसल्टिंग, कोर इंजिनियरींग, बँकिंग, फायनांस यांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होता.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) प्लेसमेंट 2021 सीझनमध्ये मोठ्या नोकरीच्या ऑफर्सनी गेल्या अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत. IIT खरगपूरला तिसऱ्या दिवशी 1100 पेक्षा जास्त प्लेसमेंट ऑफर मिळाल्या आहेत. 1 डिसेंबर रोजी प्लेसमेंट सीझनच्या पहिल्या दिवशी दिल्लीच्या विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट ऑफरसह 400 हून अधिक प्लेसमेंट ऑफर मिळाल्या, जे गेल्या 5 वर्षातील सर्वोच्च आहेत. एवढेच नाही तर यावर्षी कंपन्यांनी विद्यार्थ्यांना मोठ- मोठे सॅलरी पॅकेज दिले आहेत. IIT खरगपूरने वार्षिक 2-2.4 कोटी रुपयांच्या पॅकेजसह IIT प्लेसमेंटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

2021-22 च्या प्लेसमेंटमध्ये तिसर्‍या दिवशी IIT-खरगपूरच्या विद्यार्थ्यांना 1100 पेक्षा जास्त प्लेसमेंट ऑफर मिळाल्याने हा एक नवीन विक्रम झाला आहे. आयआयटीच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वोच्च प्लेसमेंट रेकॉर्ड आहे, असे संस्थेने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. एकूणच, संस्थेच्या विद्यार्थ्यांना 2 ते 2.4 कोटी रुपयांच्या पॅकेजसह दोन प्रमुख रिक्रूटर्सकडून विद्यार्थ्यांना 35 आंतरराष्ट्रीय ऑफर मिळाल्या आहेत.

मोठ्या पॅकेज प्लेसमेंटच्या बाबतीत IIT रुरकी, IIT गुवाहाटी आणि IIT बॉम्बेही मागे नाहीत. IIT प्लेसमेंट 2021 च्या अहवालानुसार, या वर्षी IIT दिल्ली, बॉम्बे, रुरकी, मद्रास यासह इतर ठिकाणी भरती करणार्‍यांमध्ये वाढ झाली आहे आणि वेतन-पॅकेज अनेक पटींनी वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT