India Post GDS Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पोस्टात 38 हजारहून अधिक जागांसाठी बंपर भरती

सकाळ डिजिटल टीम

पोस्टात सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झालीय.

India Post GDS Recruitment 2022 : इयत्ता 10 वी नंतर सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झालीय. भारतीय टपाल विभागानं (India Post GDS Recruitment 2022) देशभरातील विविध पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या पदांसाठी बंपर भरती जारी केलीय. इंडिया पोस्टनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, देशभरात एकूण 38926 टपाल सेवकांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर indiapostgdsonline.gov.in जाऊन आपला अर्ज करू शकतात.

भारतीय टपाल विभागानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 2 मे 2022 पासून सुरू झालीय. यामध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 5 जूनपर्यंत मुदत देण्यात आलीय. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरील उपलब्ध अधिसूचना तपासण्याचा सल्ला देण्यात आलाय.

अर्ज कसा करावा?

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइटला indiapostgdsonline.gov.in भेट द्या.

  • वेबसाइटच्या होम पेजवरील India Post Gramin Dak Sevaks Recruitment 2022 या ऑप्शनवर जा.

  • यानंतर Online Gramin Dak Sevak Engagement वर क्लिक करा.

  • आता Validate your details हा पर्याय निवडा.

  • इथं मोबाईल नंबर आणि ईमेलच्या मदतीनं नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

  • प्राप्त झालेल्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीनं तुम्ही अर्ज भरू शकता.

अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे भारत पोस्ट विभागामध्ये शाखा पोस्टमास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक यांच्या ३८,९२६ जागांसाठी रिक्त पदांची भरती केली जाईल. शाखा पोस्ट मास्टर पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना १२ हजार रुपये वेतन दिलं जाईल. तर, इतर पदांसाठी उमेदवारांना दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.

भारतीय पोस्टमधील या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचं किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे निश्चित करण्यात आलंय. तसेच सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. याशिवाय, या पदांच्या भरतीसाठी उमेदवारानं मान्यताप्राप्त बोर्डाची इयत्ता १० वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. दरम्यान, सर्व पात्र उमेदवार इंडिया पोस्ट GDS भारती २०२२ साठी अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर ५ जून २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT