नागपूर : जर तुम्हालाही आर्मीमध्ये भरती होऊन देशसेवा करण्याची संधी हवी असेल तर आता एक सुवर्णसंधी तुमच्याकडे चालून आली आहे. Indian Army Recruitment Rally 2021 मध्ये तुम्हीही आपले निवेदन पाठवू शकता. भारतीय सेना ७ एप्रिलपासून मेघालायमध्ये भरती रॅली आयोजित करणार आहे. ही रॅली १६ एप्रिलपर्यंत शिलॉंगच्या हॅपी व्हॅलीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
यासाठी उमेदवारांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. अप्लाय करण्यासाठीची तारीख २८ मार्च आहे. मात्र यासाठी अप्लाय करणाऱ्या प्रत्येकाला नो रिस्क COVID-19 सर्टिफिकेट सबमिट करणे सक्तीचे असणार आहे.
या आहेत जागा
सोल्जर जनरल ड्यूटी
सोल्जर टेक्निकल
सोल्जर ट्रेड्समैन (ऑल आर्म्स) ८ वी पास
सोल्जर ट्रैड्समैन (ऑल आर्म्स) १० वी पास
शैक्षणिक क्षमता
सोल्जर जीडी: यासाठी उमदेवारांनी दहावीमध्ये ३३ टक्के गन मिळवणे आवश्यक आहे.
सोल्जर टेक्निकल: यासाठी बारावीसह उमदेवारांना PCM मध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
सोल्जर ट्रेड्समैन: यासाठी आठवी आणि बारावी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
सैनिक जनरल ड्युटी पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचे वय साडे १७ ते २१ वर्षे (1 ऑक्टोबर 2000 आणि 1 एप्रिल 2004 दरम्यान जन्म) असणे आवश्यक आहे. उर्वरित पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा १७ and ते २३ years वर्षे (जन्म 1 ऑक्टोबर 1998 ते 1 एप्रिल 2004 दरम्यान) असावी.
ही आहे वेबसाईट
२ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत admit कार्ड अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील.भारतीय सैन्य भरती रॅलीत सामील होण्यासाठी पात्रता निकष आणि उर्वरित आवश्यक तपशिलासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ joinindianarmy.nic.in वर जाऊ शकतात आणि माहिती घेऊ शकतात.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.