sea cadet corps google
एज्युकेशन जॉब्स

Navy Day : मुंबईतील २५०० विद्यार्थी रविवारी पहाटे उठून कुलाब्याला का जातात ?

हे प्रशिक्षण बहुतांशी शारीरिक हालचालींवर आधारित असते. त्यामुळे अर्ज करणारा विद्यार्थी हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे.

नमिता धुरी

मुंबई : सी कॅडेट्स हे समुद्री कॅडेट कॉर्प्सचे सदस्य आहेत, जलजन्य क्रियाकलापांमध्ये आणि राष्ट्रीय नौदलामध्ये स्वारस्य असलेल्या तरुणांसाठी एक औपचारिक गणवेशधारी आंतरराष्ट्रीय युवा संघटना आहे. संस्थेला नौदल किंवा नौदल समर्थक संस्थेद्वारे संपूर्ण किंवा अंशतः प्रायोजित केले जाऊ शकते.

सी कॅडेट संघटना जगातील बहुतेक सागरी राष्ट्रांमध्ये अस्तित्वात आहेत. भारतात मुंबईतील कुलाबा येथे या संघटनेचे केंद्र आहे. 'ट्रेनिंग शिप जवाहर' या नावाने ते ओळखले जाते. मुंबई आणि परिसरातील १० ते १८ वयोगटातील २५०० विद्यार्थी दर रविवारी पहाटे या केंद्रावर प्रशिक्षणासाठी जमा होतात.

पात्रता निकष

वयाची १२ वर्षे पूर्ण झालेली मुले आणि मुली या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.

हे प्रशिक्षण बहुतांशी शारीरिक हालचालींवर आधारित असते. त्यामुळे अर्ज करणारा विद्यार्थी हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे. अभ्यासातही त्याची प्रगती उत्तम असणे आवश्यक आहे व इंग्रजीतून अस्खलितपणे संभाषण, वाचन, लेखन करता येणे आवश्यक आहे.

नोंदणी केल्यानंतर ६ महिन्यांच्या कालावधीत या विद्यार्थ्याने पोहण्याच्या प्रशिक्षणाची स्वत:हून व्यवस्था करणे अपेक्षित आहे. दर रविवारी या विद्यार्थ्याने प्रशिक्षणासाठी उपस्थित राहाणे बंधनकारक असते. ९० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

फायदा काय ?

या प्रशिक्षणामुळे लहान वयात मुलांमध्ये शिस्त, वक्तशीरपणा, शारीरिक सुदृढता, साहस, इत्यादी गुण रुजवले जातात. मुलांच्या किशोरवयातील ऊर्जेला याद्वारे दिशा आणि वाव मिळतो. साहसी प्रात्यक्षिकांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो.

हे प्रशिक्षण पूर्ण केलेली मुले पुढे जाऊन येथे प्रशिक्षक म्हणूनही काम करू शकतात. तसेच लहान वयात देशभक्तीचे धडे मिळाल्यामुळे संरक्षण दलांमधील संधी त्यांच्यासाठी खुल्या होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT