IOCL Recruitment

 

esakal

एज्युकेशन जॉब्स

Indian Oil Recruitment 2025 : ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’कडून २७००हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा!

Latest Indian Oil Recruitment update : जाणून घ्या, नेमकी कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे आणि शिक्षण, वयाची अट काय?

Mayur Ratnaparkhe

IOCL Vacancy Details for 2700+ Posts : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने एक मोठी भरती सूचना जाहीर केली आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी, कंपनीने त्यांच्या रिफायनरी विभागात २७०० हून अधिक ट्रेड, टेक्निशियन आणि पदवीधर अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवाराना २८ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ पर्यंत IOCL च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. IOCL ने लेखी परीक्षेची तात्पुरती तारीख २९ डिसेंबर २०२५ अशी निश्चित केली आहे, ज्याचे निकाल ९ जानेवारी २०२६ पर्यंत अपेक्षित आहेत. ही परीक्षा अंतिम निवडीसाठी आधार बनणार आहे.

शैक्षणिक पात्रता -

ट्रेड अप्रेंटिस उमेदवारांकडे गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्रात तीन वर्षांची बी.एससी. पदवी असणे आवश्यक आहे, टेक्निशियन अप्रेंटिस उमेदवरांना संबंधित अभियांत्रिकी शाखेत तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे आणि ट्रेड अप्रेंटिस उमेदवार हे मॅट्रिक उत्तीर्ण असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये दोन वर्षांचे आयटीआय प्रमाणपत्र असले पाहिजे.

वयोमर्यादा -

सामान्य आणि ईडब्ल्यूएस श्रेणींसाठी वयोमर्यादा १८ ते २४ वर्षे आहे. ओबीसी (एनसीएल) उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. एससी/एसटी उमेदवारांसाठी कमाल वय २९ वर्षे आहे आणि पीडब्ल्यूबीडी (यूआर/ईडब्ल्यूएस) उमेदवारांसाठी कमाल वय ३४ वर्षे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT