Indian Railway  esakal
एज्युकेशन जॉब्स

रेल्वेत 10 वी, पदवीधरांना परीक्षेशिवाय नोकरी! अर्ज दाखल करण्यास सुरवात

भारतीय रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी.

भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railway) नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी. यासाठी (Indian Railway Recruitment 2022) भारतीय रेल्वेने नॉर्थ ईस्टर्न रेल्वे अंतर्गत स्पोर्ट्स कोट्यातील ग्रुप सी (Indian Railway Recruitment 2022)च्या या विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी (Indian Railway Recruitment 2022) अर्ज करायचा आहे, ते भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ner.indianrailways.gov.in अर्ज करू शकतात. या पदांसाठी (Indian Railway Recruitment 2022) आजपासून म्हणजेच 26 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

याशिवाय उमेदवार या पदांसाठी (Indian Railway Recruitment 2022) या लिंकवर थेट क्लिक करून अर्ज करू शकतात https://ner.indianrailways.gov.in/. https://ner.indianrailways.gov.in/uploads/files/1648033125339-RRC%20 या लिंकद्वारे तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन (Indian Railway Recruitment 2022) पाहू शकता. या भरती (Indian Railway Recruitment 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 21 पदे भरण्यात येणार आहेत.

भारतीय रेल्वे भरती 2022 साठी महत्त्वाच्या तारखा

- अर्ज सुरू होण्याची तारीख - 26 मार्च

- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल

भारतीय रेल्वे भरती 2022 साठी पद संख्या

- एकूण पद संख्या - 21

भारतीय रेल्वे भरती 2022 साठी पात्रता निकष

- जी.पी.- 1900/2000 ची पदे : उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10+2 किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

- जी.पी.- 2400 ₹(टेक्निकल) असलेली पदे : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून गणित किंवा भौतिकशास्त्र विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले असावेत.

- जी.पी. - ₹ 2800 ची पदे: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

भारतीय रेल्वे भरती 2022 साठी वयोमर्यादा

उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी.

भारतीय रेल्वे भरती 2022 साठी अर्ज शुल्क

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक, बेंचमार्क अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूबीडी), महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवार वगळता सर्व उमेदवारांना 500 रुपये भरावे लागतील.

भारतीय रेल्वे भरती 2022 साठी निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ही क्रीडा व शैक्षणिक पात्रतेच्या चाचणी व मूल्यमापनातील कामगिरीच्या आधारे केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Gold Smuggling Sangli Man Arrested : आसाममध्ये सोने तस्करी करणारा संशयित दिघंचीचा? सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई, 55 कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

SCROLL FOR NEXT