Google IT Layoff 2023 sakal
एज्युकेशन जॉब्स

Google Laysoff 2023 : गुगलच्या पॅरेंट कंपनीतून १२ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

कंपनीच्या या निर्णयाचा जगभरातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

IT Layoff 2023 : एकीकडे संपूर्ण जगात मंदीचे सावट असताना आता गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

कंपनीकडून २० जानेवारी रोजी केलेल्या घोषणेत म्हटले आहे की, कर्मचारी कपातीअंतर्गत कंपनी जगभरातील अंदाजे १२ हजार कर्मचारी किंवा ६ टक्के कर्मचारी कमी करण्याची योजना आखत आहे. याबाबत मनी कंन्ट्रोलने वृत्त प्रकाशित केले आहे.

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याच्या निर्णयाच्या काही दिवसांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कंपनीच्या या निर्णयाचा जगभरातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. याबाबत कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवला आहे.

यामध्ये त्यांनी घेण्यात आलेल्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे म्हटले आहे. कर्मचारी कपात जागतिक असून, याचा सर्वाधिक परिणाम यूएसच्या कर्मचार्‍यांवर दिसून येईल असे Google ने म्हटले आहे.

स्विगीकडून कर्मचारी कपातीची घोषणा

दरम्यान, जागतिक मंदीच्या गर्तेत शुक्रवारी फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने 380 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. कापातीचा निर्णण खूप कठीण असल्याचे कंपनीने म्हटले आहे.  

याबाबत कंपनीच्या सीईओंनी कर्मचाऱ्यांना मेल पाठवत या निर्णयाबाबत माफी मागितली आहे. सर्व संभव्य गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे सीईओ श्रीहर्ष मॅजेती यांनी मेलमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT