ITBP google
एज्युकेशन जॉब्स

Job Alert : १०वी पासवाल्यांसाठी आनंदाची बातमी, लेखी परीक्षेशिवाय भरती; लाखो रुपये पगार

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

नमिता धुरी

मुंबई : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये अनेक पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर दिली आहे. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते २१ मार्च २०२३ पर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. (ITBP GD Constable Recruitment 2023) हेही वाचा - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

अधिसूचनेनुसार, ७१ पदांवर भरतीद्वारे नियुक्त्या केल्या जातील. मात्र, ही भरती क्रीडा कोट्यातील आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अधिक माहिती मिळवू शकतात.

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल. सुरुवातीला २ लाख १७ हजार ते ६९ हजार १०० रुपये पगार दिला जाईल. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार पगार आणि पगाराशी संबंधित अधिक माहिती तपासू शकतात.

वय श्रेणी

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षे असावे. २१ मार्च २०२३ रोजी वयोमर्यादा मोजली जाईल. तथापि, भारत सरकारच्या नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST) आणि क्रीडा चाचणीच्या आधारावर केली जाईल. निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

अर्ज फी

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल.

याप्रमाणे अर्ज करा

  • सर्वप्रथम सर्व उमेदवारांनी recruitment.itbppolicenic.in वर जावे.

  • त्यानंतर ITBP रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करावे.

  • यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करून ITBP चा फॉर्म भरावा.

  • यानंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि फी जमा करा.

  • यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT