admission admission
एज्युकेशन जॉब्स

ITI admission 2021: चलो आयटीआय! प्रवेश नोंदणी सुसाट

दहावीच्या निकालानतंर आयटीआयची प्रवेशप्रक्रियेला गती मिळाली आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या ट्रेड आणि आयटीआयसाठी विकल्प अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे

संदीप लांडगे

दहावीच्या निकालानतंर आयटीआयची प्रवेशप्रक्रियेला गती मिळाली आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या ट्रेड आणि आयटीआयसाठी विकल्प अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे

औरंगाबाद: आयटीआय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत १५ जुलैपासन नोंदणी सुरू झाली आहे. राज्यात यंदा शासकीय संस्थांमध्ये ९३ हजार ८१६ तर खासगी संस्थांत ५५ हजार ४८० अशा एकूण सुमारे १ लाख ४९ हजार २१६ जागा उपलब्ध आहेत. बुधवारपर्यंत (ता.चार) सुमारे एक लाख १७ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज (नोंदणी) केले आहेत. त्यात मराठवाड्यातून तब्बल ३१ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

दहावी निकालाचा परिणाम-
दहावीच्या निकालानतंर आयटीआयची प्रवेशप्रक्रियेला गती मिळाली आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या ट्रेड आणि आयटीआयसाठी विकल्प अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोरोनामुळे दहावीची परीक्षा न झाल्यामुळे मूल्यांकन पद्धतीने जाहीर केलेल्या निकालात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मराठवाड्यातून सुमारे तीन लाख विद्याथी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना सीईटीची अट घातली आहे; परंतु आयटीआयच्या प्रवेशाला अकरावीप्रमाणे सीईटीसारखी अट नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आयटीआय प्रवेशाला पसंती मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज येतील, अशी शक्यता शासकीय आयटीआयचे प्रा. अभिजित अल्टे यांनी व्यक्त केली. दरम्यान, विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी आणखी सुमारे दीड महिन्याचा कालावधी असून त्यानंतर विविध फेऱ्या होऊन प्रवेश निश्चित होतील.

मराठवाड्यातील स्थिती-
यंदा मराठवाड्यातील ८२ शासकीय आयटीआयमध्ये १४ हजार, तर ५७ खासगी आयटीआयमध्ये पाच हजार ६०८ अशा एकूण २० हजार २६४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. मागील आठवडाभरात ३० हजार ९८७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. आयटीआयमध्ये जिल्ह्यातील स्थानिक ९० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून परजिल्ह्यातील दहा टक्के विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: निवृत्तीच्या वनडेत एलिसा हेलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधनाचा विक्रमही मोडला; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाईटवॉश

Navi Mumbai: ऐरोलीत ‘नो पार्किंग’ फलक नाममात्र! रुग्णालयाबाहेर बेकायदा पार्किंग; रुग्ण, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा

Holika Dahan 2026: यंदा पहिल्यांदाच होळीची पूजा करताय? जाणून घ्या होलिका दहनाची विधिवत आणि योग्य पद्धत

Latest Marathi News Update : महिन्याभरात राज्यातील सगळ्या कार्यालयांचे पॉश ऑडिट करण्याचे महिला आयोगाचे निर्देश

Accidental Death: शेतकऱ्याचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू; बार्शी तालुक्यातील धक्कादायक घटना, शेतात जनावरे घेऊन गेले अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT