JEE Main exam results and national rankings announced  esakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Main परिक्षेत गार्गी बक्षी देशात 19वी

अरूण मलाणी

नाशिक : जॉइंट एन्‍ट्रान्‍स एक्‍झाम (JEE) मेन्‍स परीक्षेचा निकाल व राष्ट्रीय क्रमवारी जाहीर झाली आहे. या परीक्षेत नाशिक येथून शालेय शिक्षण घेतलेल्‍या गार्गी बक्षी हिने राष्ट्रीय क्रमवारीत १९ व्‍या क्रमांकासह यश मिळविले. तिच्‍यासह नाशिकच्‍या अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविताना जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced) परीक्षेसाठी आवश्‍यक पात्रता मिळवत स्‍वप्‍नाच्‍या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

जेईई ॲडव्हान्स्डच्‍या नोंदणीची सोमवारपर्यंत मुदत

जेईई मेन्‍स परीक्षेतून पात्रता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेला प्रविष्ट होता येणार आहे. यंदा आयआयटी खरगपूरतर्फे (IIT Kharagpur) जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा होणार आहे. पात्र विद्यार्थ्यांच्‍या नोंदणीला बुधवार (ता. १५)पासून सुरवात झाली असून, सोमवार (ता. २०)पर्यंत ऑनलाइन नोंदणीची मुदत आहे. मंगळवार (ता. २१)पर्यंत शुल्‍क भरण्याची मुदत असेल. ३ ऑक्‍टोबरला देशभरातील परीक्षा केंद्रांवर जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा होणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे (NTA) यंदा चार सत्रांत जेईई मेन्‍स परीक्षा झाली. त्‍यापैकी अंतिम दोन सत्र कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेत प्रभावित झाले होते. परिस्‍थिती निवळल्‍यानंतर या परीक्षा झाल्‍या. नंतर ‘एनटीए’मार्फत जेईई मेन्‍सचा अंतिम निकाल व राष्ट्रीय क्रमवारी जारी केली.

यात नाशिकहून शालेय शिक्षण घेतलेल्‍या गार्गी बक्षी हिने राष्ट्रीय क्रमवारीत १९ वा क्रमांक पटकावला. तिच्‍यासह शाहजेब अर्शद ९९.९७, गौतम आहुजा ९९.६९, आदित्‍य मोहिते ९९.३३, समर्थ ससाने ९९.२० यांनीही यश मिळविले.

स्‍पेक्‍ट्रम येथील विद्यार्थ्यांनी उज्‍ज्‍वल यश मिळविले. यात तन्‍मय राणे याने ९९.८३ पर्सेंटाईल, हरीश गायधनी याने ९९.८१ पर्सेंटाईल गुण मिळवून पात्रता मिळविली. समीर देशपांडे (९९.६२), गौरांग दहाड (९९.६२), रोहित शाह (९९.५९), सोहम पाटील (९९.५४), प्राजक्‍ता दराडे (९९.५४), हृषीकेश कच्‍छवा (९९.३९), महावीर खिंवसरा (९९.३५), प्रसन्ना दवंगे (९९.२६), संकेत बाफना (९९.२६), संदेश आहिरे (९९.१४), अमित सोनजे (९९.०८), जिनम संचेती (९९) यांनीही यश मिळविले. शहर व जिल्‍ह्यातील अन्‍य काही विद्यार्थ्यांनी जेईई मेन्‍समध्ये यश मिळवून जेईई ॲडव्हान्स्डसाठी पात्रता प्राप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: अरे पळ, घे चेंडू खाली ठेवतो...! रवींद्र जडेजाने दिलेली खुली ऑफर, पण जो रूट निघाला 'शहाणा'; Video Viral

Jasprit Bumrah : Video - बुमराहने असाकाही भन्नाट बॉल टाकला, की जगातील तो टॉपचा बॅट्समनही त्याचा ‘बोल्ड’ पाहतच राहिला!

IND vs ENG 3rd Test: जो रूटने वाढवली भारताची चिंता! अनपेक्षित पाहुण्यांमुळे सारेच हैराण, पहिल्या दिवशी इंग्लंडचे वर्चस्व

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजने बॉल फेकून मारलाच होता, जो रूटवर खवळला; नेमकं काय घडलं?

Radhika Yadav: 'तो' वाद अन्...; टेनिस खेळाडू राधिका यादवला वडिलांनी का संपवलं? पोलिसांनी खरं कारण सांगितलं!

SCROLL FOR NEXT