JIPMER esakal
एज्युकेशन जॉब्स

JIPMER मध्ये सरकारी नोकरीची संधी! गट B अन्‌ C पदांची भरती

JIPMER मध्ये सरकारी नोकरीची संधी! गट B अन्‌ C पदांची भरती

सकाळ वृत्तसेवा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी JIPMER यामध्ये सरकारी नोकरीची संधी आहे.

सोलापूर : नोकरीच्या (Jobs) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी JIPMER मध्ये सरकारी नोकरीची (Government Job) संधी आहे. भारत सरकारच्या (Government Of India) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (Ministry of Health and Family Welfare) अंतर्गत जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (Jawaharlal Institute of Post Graduate Medical Education and Research - JIPMER) ने गट B आणि गट C 20 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संस्थेने 13 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या भरतीच्या (Recruitment) जाहिरातीनुसार, गट ब मधील वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि गट क मधील कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (JIPMER will be recruiting for Group B and C posts)

असा करा अर्ज

JIPMER भरती 2022 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अनाउन्समेंट विभागात दिलेल्या लिंकद्वारे संस्थेच्या अधिकृत वेबसाइट jipmer.edu.in ला भेट देऊ शकतात. अधिसूचना जारी झाल्यापासून अर्ज प्रक्रियेची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 5 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतील. अर्जादरम्यान उमेदवारांना विहित शुल्क देखील भरावे लागेल, जे ते ऑनलाइनद्वारे भरू शकतात. अनारक्षित, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क 1500 रुपये आहे तर SC / ST उमेदवारांसाठी 1200 रुपये शुल्क आहे. अपंग उमेदवारांना शुल्कात संपूर्ण सूट दिली आहे.

अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या पात्रता

  • वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट बी) (Medical Laboratory Technician) : उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून वैद्यकीय प्रयोगशाळा विज्ञान विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव आवश्‍यक आहे. याव्यतिरिक्त उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

  • कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (गट क) (Junior Administrative Assistant) : मान्यताप्राप्त मंडळातून 12 वी उत्तीर्ण आणि संगणकावर (Computer) इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रतिमिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रतिमिनिट टाईपिंगचा (Typing) वेग असावा. तसेच, उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

SCROLL FOR NEXT