Airports esakal
एज्युकेशन जॉब्स

AAI मध्ये नोकरीची मोठी संधी; 'इतका' मिळणार पगार

सकाळ डिजिटल टीम

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

AAI WR Recruitment 2021 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये (Airports Authority of India) अप्रेंटिस पदासाठी नुकतेच अर्ज मागविले आहेत. AAI प्रादेशिक मुख्यालय अप्रेंटिस अॅक्ट 1961/2014 अंतर्गत यासंदर्भात जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलीय.

या रिक्त पदांतर्गत ग्रॅज्युएट्स अप्रेंटिस, डिप्लोमा आणि आयटीआय प्रशिक्षित शिकाऊ उमेदवारांच्या पदांवर भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती महिन्याच्या अखेरीस म्हणजेच, 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहिल. तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. दरम्यान, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर @aai.aero जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

रिक्त जागा

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस – 25 पदे

  • डिप्लोमा अप्रेंटिस - 38 पदे

  • आयटीआय अप्रेंटिस – 27 पदे

शैक्षणिक पात्रता : ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडं कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी असणं आवश्यक आहे, तर डिप्लोमा अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात डिप्लोमा केलेला असावा. याशिवाय, आयटीआय ट्रेड अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे. या पदावरील उमेदवारांची निवड घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

पगार

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस - 15,000 रुपये

  • डिप्लोमा अप्रेंटिस – 12 हजार रुपये

  • आयटीआय ट्रेड अप्रेंटिस – 9000 रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : अजितदादांना सर्वात मोठा धक्का! पिंपरी-चिंचवडचा निकाल समोर, भाजपची एकहाती सत्ता

Maharashtra Municipal Election Results 2026 : मराठवाड्यातही महायुतीची सरसी ! छ.संभाजीनगरमध्ये भाजप आघाडीवर तर शिवसेना 'इतक्या' जागांवर पुढे

Ichalkaranji Election Result : इचलकरंजीत संजय तेलनाडेंसह कुटुंबातील दोन सदस्यांचाही विजय; राहुल आवाडेंच्या कट्टर समर्थकाचा पराभव

खासदाराची लेक, माजी आमदाराचा मुलगा अन् अरुण गवळींच्या मुलीला मतदारांनी नाकारलं; दिग्गजांच्या नातलगांचा पराभव

Infosys Share : Infosys साठी तिमाही निकाल ठरले 'गेम चेंजर'! नफा घसरूनही शेअर 5% उसळला; BUY, HOLD की SELL? तज्ञांचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT