Pune_ZP 
एज्युकेशन जॉब्स

मेगा भरती : पुणे झेडपीत दीड हजार जागांवर भरती; फक्त मुलाखत द्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगा भरती करण्यात येणार आहे. यानुसार या विभागातील एक हजार ५२१ रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी येत्या ४ ते ७ एप्रिल या कालावधीत थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी १० ते दुपारी तीन
वाजेपर्यंत या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

याबाबतची जाहिरात पुणे जिल्हा परिषदेच्या https://punezp.mkcl.org या
संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रिक्त पदांमध्ये विशेषतज्ज्ञ
(फिजिशियन), भूलतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी (ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक),
दंतरोग तज्ज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक, स्टाफ नर्स, एएनएम, क्ष- किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, डाटा एंट्री ऑपरेटर आदींचा समावेश आहे.

ही सर्व पदे कोरोना प्रतिबंधासाठी सुरु करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यातील
कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड आरोग्य केंद्र आणि समर्पित कोविड
रुग्णालयासाठी असणार आहेत. किमान तीन महिने कालावधीसाठी (आवश्यकतेनुसार कालावधी वाढवणार) कंत्राटी पद्धतीने किंवा मानधन तत्त्वावर भरण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी सांगितले.

यासाठी एम.डी. (मेडिसिन), एम.डी.किंवा डी.एन.बी. (ॲनेस्थेशिया), एम.बी.बी.एस., बी.ए.एम. एस., बी.डी. एस., जी.एन..एम किंवा बी एस्सी
(नर्सिंग), एएनएम., क्ष-किरण तंत्रज्ञ अभ्यासक्रम उत्तीर्ण, बी एस्सी, डीएमएलटी, डी. फार्मसी, बी. फार्मसी आणि पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत.

मुलाखतीसाठी आवश्‍यक कागदपत्रे

- वयाचा पुरावा.

- पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र.

- रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र.

- अनुभव प्रमाणपत्र.

- रहिवासी प्रमाणपत्र.

- जातीचे प्रमाणपत्र.

- एक छायाचित्र.

पदनिहाय प्रमुख रिक्त जागा

- वैद्यकीय अधिकारी (सर्व मिळून) - ५३७.

- स्टाफ नर्स (परिचारिका) - ४३४.

- एएनएम - २९०.

- प्रयोगशाळा तंत्रज्ञ - १७.

- ईसीजी तंत्रज्ञ - २४.

- क्ष-किरण तंत्रज्ञ - १५.

- रुग्णालय व्यवस्थापक - २७.

- औषधनिर्माता - ३७.

- भूलतज्ज्ञ - २२.

- फिजिशियन - १६.

- अधिक माहितीसाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT