Railway Project
Railway Project esakal
एज्युकेशन जॉब्स

दहावी आणि ITI उत्तीर्णांसाठी रेल्वेत अप्रेंटिसशीपची संधी

शर्वरी जोशी

जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल किंवा आयटीआय ITI डिप्लोमा केला असेल तर तुमच्यासाठी रेल्वेत नोकरीची (Railway Jobs) संधी आहे. उत्तर-मध्य रेल्वेमध्ये North Central Railway अप्रेंटिस पदासाठी १६०० जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही परिक्षेशिवाय या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. मेरीटच्या आधारावर ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. (jobs junction rrc ncr railway recruitment 2021 apprentice vacancy for 10th iti pass)

पदाचे नाव - अॅक्ट अप्रेंटिस

पदसंख्या -

प्रयागराज डिव्हिजन (मेकॅनिकल विभाग) -३६४ पदे

प्रयागराज (इलेक्ट्रिकल विभाग) - ३३९ पदे

झांसी डिव्हिजन - ४८० पदे

झांसी रेल्वे वर्कशॉप - १८५ पदे

आग्रा डिव्हिजन - २९६ पदे

एकूण पदसंख्या- १६६४

शैक्षणिक पात्रता -

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान १० वी/मॅट्रीक/सेकंडरी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. तसंच एनसीव्हीटी (NCVT) किंवा एससीव्हीटी (SCVT) मान्यताप्राप्त संस्थांमधून संबंधिक स्ट्रीममध्ये आयटीआय सर्टिफिकेट असणं गरजेचं.

वयोमर्यादा -

१५ ते २४ वर्षांपर्यंत कोणताही उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतो. तसंच अप्रेंटिसशिपच्या नियमांच्या आधारे कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जाईल.

निवड प्रक्रिया-

आरआरसी (RRC ) एनसीआर (NCR) अप्रेंटिस पदासाठी कोणतीही लेखी परिक्षा घेतली जाणार नाही. मात्रस १० वी आणि आयआयटीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट काढली जाईल व उमेदवार निवडले जातील.

अर्जप्रक्रिया -

आरआरसी (RRC ) एनसीआर (NCR) अप्रेंटिस पदासाठी २ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामुळे उमेदवार १ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवारांना रेल्वे रिक्रुटमेंट सेल प्रयागराजच्या (RRC Prayagraj) rrcpryg.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. २ऑगस्ट २०२१ ते १ सप्टेंबर २०२१ या काळात इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT