jobs jobs
एज्युकेशन जॉब्स

नेव्हीमध्ये नोकरी करण्याची संधी, अट दहावी पास

सकाळ वृत्तसेवा

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अन् नेव्हीमध्ये जाण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन नेव्हीमध्ये 'सेलर' 33 पदांसाठी भरती सुरु झाली आहे. दहावी पास उमेदवार यासाठी अर्ज करु शकतो. नेव्हीमध्ये काम करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवार दोन ऑगस्ट ते 6 ऑगस्ट यादरम्यान अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करु शकतात.

रिक्रुटमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून इंडियन नेव्हीमध्ये 33 सेलर पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी जवळपास 300 पेक्षा जास्त जणांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2021 च्या बॅचसाठी भरती करण्यात येणार आहे.

वयोमर्यादा आणि प्रवेश शुल्क अन् वेतन -

1 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2004 या दरम्यानचा उमेदवाराचा जन्म असावा. कोणत्याही प्रवर्गाला उमेदरावाला वयोमानात विशेष सवलत देण्यात आली नाही. विशेष म्हणजे, या पदांसाठी अर्ज कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ट्रेनिंगसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 14,600 रुपयांचा स्टायपेंड देण्यात येणार आहे. त्यानंतर 3 डिफेन्स पे नुसार 21,700 ते 69,100 रुपये वेतन देण्यात येणार आहे. त्याचसोबत डीए आणि 5200 रुपये दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थितीचे बंधन! महाविद्यालयांकडून विरोध अन्‌ बायोमेट्रिक हजेरीत शिथिलता; कुलगुरू म्हणाले, ‘मुले वर्गात यावीत, एवढाच उद्देश’

सोलापूर क्राईम ब्रॅंचची कारवाई! सोलापुरातील तरूणांना ‘एमडी’ ड्रग्ज पुरवणारा मुंबईचा मेहमूद दुसऱ्यांदा जेरबंद; कोर्टात नेण्यापूर्वी वाढला ‘बीपी’ अन्‌...

मोठी बातमी! शिक्षकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी आता राज्यस्तरीय समिती; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; ‘या’ १६ तक्रारींवर मिळणार ३० दिवसांत निर्णय, वाचा...

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT