cost and management accounting
cost and management accounting sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर घडविताना : कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग; अंतिम स्तराचा अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा

- के. रवींद्र

मागील लेखात आपण कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग कोर्समधील फाउंडेशन व इंटरमिजिएट या दोन स्तराबद्दल माहिती घेतली, यालेखात आपण कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग मधील अंतिम म्हणजेच फायनल स्तराबद्दल सविस्तर माहिती घेऊया. अभ्यासक्रम हा पदव्युत्तर समतुल्य आहे.

कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट व्यावसायिकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया संस्था २०२२मध्ये नवीन अभ्यासक्रम जून २०२३पासून लागू करत आहे. याअंतर्गत बिझनेस कम्युनिकेशन, बिझनेस डेटा अॅनालिटिक्स, बँकिंग आणि इन्शुरन्समधील रिस्क मॅनेजमेंट आणि एंटरप्रेन्युअरशिप आणि स्टार-अप यांसारख्या नवीन विषयांचा समावेश केला आहे.

कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट्ससाठी व्यावसायिक संधी - कॉस्ट ऑडिट करणे, जीएसटी ऑडिट, अंतर्गत ऑडिट, बँकांसाठी स्टॉक ऑडिट, टॅक्स कन्सल्टन्सी, बँकिंग क्षेत्रातील रिकव्हरी कन्सल्टंट तर सल्लागार, विश्वस्त, कार्यकारी, प्रशासक म्हणून काम पाहता येते.

फायनल स्तरासाठी परीक्षेचा पॅटर्न

ग्रुप - ग्रुप तिसरा आणि ग्रुप चौथा

प्रश्नांचा प्रकार - बहुपर्यायी व लघूत्तरी किंवा दीर्घोत्तरी

परीक्षेचा कालावधी - ३ तास

एकूण गुण - १०० गुण

एकूण पेपर्स - ८ पेपर्स

प्रश्नांची संख्या - प्रत्येकी पेपरला १२० प्रश्न

गुणांकन योजना - निगेटिव्ह मार्किंग नाही

परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी उमेदवारांनी सीएमए अंतिम परीक्षेच्या अभ्यास सामग्रीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व प्रकरणांचे पुनरावलोकन करणे महत्त्वाचे आहे. ICMAI उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून सीएमए अभ्यास साहित्य डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या लिंक

१) https://icmai.in

२) https://vidyarthimitra.org/news

(लेखक विद्यार्थी मित्र

www.VidyarthiMitra.org चे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

SCROLL FOR NEXT