Karnataka Court Board Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

Board Exam : 'बोर्डा'च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर निर्णय, कधी होणार परीक्षा?

न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर शिक्षण खात्याने (Education Department) परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर माध्यान्ह आहार उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.

बेळगाव : मूल्यमापन (बोर्ड) परीक्षा (Board Exam) घेण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर शिक्षण खात्याने (Education Department) परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, दहावीचे पेपर असलेल्या दिवशी दुपारच्या सत्रात पेपर ठेवण्यात आल्यामुळे शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच दहावीचा पेपर पूर्ण करून पुन्हा शिक्षकांना आपल्या शाळेत यावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांची धावपळ होणार आहे.

पाचवी, आठवी, नववीच्या बोर्ड परीक्षेविरोधात खासगी शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापन मंडळाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे परीक्षेला ब्रेक लागला होता. मात्र, शुक्रवारी न्यायालयाने (Court) परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर शिक्षण खात्याने शिल्लक असलेल्या पेपरचे तातडीने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे सोमवारपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. मात्र, याच काळात दहावीच्या परीक्षेलाही सुरुवात होणार आहे.

दहावीचे पेपर सकाळच्या सत्रात पार पडणार आहेत. त्यामुळे ज्या दिवशी दहावीचा पेपर आहे. त्याच दिवशी पाचवी, आठवी, नववीचा बोर्ड परीक्षेचा पेपर दुपारच्या सत्रात घेतला जाणार आहे. तर दहावीचा पेपर नसलेल्या दिवशी सकाळच्या सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची दहावी परीक्षेसाठी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर नेमणूक केली आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रकाबाबत अनेक शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून दहावीचे पेपर नसलेल्या दिवशी गरजेचे होते, असे मत व्यक्त होत आहे.

माध्यान्ह आहारही देणार

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर माध्यान्ह आहार उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर किती विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. याची माहिती संकलित केली असून पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक

इयत्ता पाचवी

२५ मार्च परीसर अध्ययन

२६ मार्च गणित

इयत्ता आठवी

२५ मार्च कन्नड, इंग्रजी (तृतीय भाषा)

२६ मार्च गणित

२७ मार्च विज्ञान

२८ मार्च समाज विज्ञान

इयत्ता नववी

२५ मार्च कन्नड, इंग्रजी (तृतीय भाषा)

२६ मार्च गणित

२७ मार्च विज्ञान

२८ मार्च समाज विज्ञान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT