Karnataka Hijab Controversy esakal
एज्युकेशन जॉब्स

Karnataka Hijab Controversy : कॉलेज 16 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

सकाळ डिजिटल टीम

'कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीची पावले उचलली पाहिजेत.'

बंगळुरु : कर्नाटकातील (Karnataka) हिजाब वादाच्या (Hijab Controversy) पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागानं सर्व पदवी महाविद्यालये, विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रम संस्था 16 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याआधी उच्च शिक्षण विभागानं 9 ते 11 फेब्रुवारीदरम्यान या शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली होती. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी काल घेतला.

कर्नाटक उच्च न्यायालय (Karnataka High Court) हिजाब बंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उडुपीतील सरकारी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजच्या पाच विद्यार्थिनींनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करत आहे. यापूर्वी 8 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री बोम्मई यांनी राज्यातील सर्व हायस्कूल आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काल शुक्रवारी कॉलेज बंद ठेवण्याची मुदत 16 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटक सरकारनं काल जिल्हा प्रशासनाला सूचना देताना सांगितलं की, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीची पावले उचलली पाहिजेत. एसपी आणि डीसी यांनी संवेदनशील भागातील प्रमुख शाळांना भेटी द्याव्यात. संवेदनशील भागात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच 10 वी पर्यंतच्या शाळा 14 फेब्रुवारी रोजी राज्यभरात पुन्हा सुरू होणार आहेत, असं सरकारनं स्पष्ट केलं. एएनआयच्या वृत्तानुसार, सीएम बोम्मई यांनी काल राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT