Karnataka 2nd PUC Result esakal
एज्युकेशन जॉब्स

Karnataka 2nd PUC Result : व्दितीय PUC परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या उत्तीर्णतेची टक्केवारी

कर्नाटक पूर्व-विद्यापीठ परीक्षा मंडळानं पीयूसी परीक्षेचा आज निकाल जाहीर केला.

Balkrishna Madhale

यंदा एकूण 74.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्याचा निकाल सर्वोत्कृष्ट लागला आहे.

Karnataka 2nd PUC Result 2023 : कर्नाटक पूर्व-विद्यापीठ परीक्षा मंडळानं पीयूसी परीक्षेचा आज निकाल जाहीर केला. karresults.nic.in यावर जाऊन किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतात.

यंदा एकूण 74.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्याचा निकाल सर्वोत्कृष्ट लागला आहे. दुसऱ्या क्रमांकावर उडुपी जिल्हा आहे. यावर्षी कर्नाटक पीयूसी व्दितीय अंतिम परीक्षा 9 ते 29 मार्च 2023 दरम्यान राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.

परीक्षा सर्व दिवस सकाळी 10.15 ते दुपारी 1.30 या वेळेत एकाच शिफ्टमध्ये घेण्यात आली. सुमारे 7 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 2022 मध्ये कर्नाटक व्दितीय PUC परीक्षा 16 एप्रिल ते 4 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल 18 जून 2022 रोजी जाहीर झाला.

कर्नाटक पीयूसी द्वितीय परीक्षेला 6,83,563 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 4,22,966 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 61.88 टक्के आहे. मुलांचं हे प्रमाण 52.22 टक्के आणि मुलींचं 68.72 टक्के होतं.

Karnataka 2nd PUC Result 2023 : अशा प्रकारे पहा निकाल

  • बारावी परीक्षेचा निकाल तुम्ही karresults.nic.in या वेबसाइटवर जाऊन पाहू शकता

  • होम पेजवर जाऊन कर्नाटक व्दितीय PUC निकाल 2023 च्या लिंकवर क्लिक करा

  • आता तुमच्या रोल नंबरनं लॉग इन करा.

  • त्यानंतर तुमचं स्कोअरकार्ड पहा आणि डाउनलोड करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

दिवाळीनंतर चमकणार 'या' ३ राशींचे नशीब! बुधाची सरळ चाल ठरणार गेमचेंजर; हातात खेळणार अपार पैसा...

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT