Keep these things in mind when making career decisions Marathi story  
एज्युकेशन जॉब्स

करिअरबद्दल महत्वाचे निर्णय घेताय? 'या' गोष्टी लक्षात असू द्या

सकाळ डिजिटल टीम

करिअर नेमके कुठल्या क्षेत्रात करायचे? हा निर्णाय मोठा असतो, कारण की हा एक निर्णय तुमचे संपुर्ण आयुष्यावर प्रभाव पाडणार असतो. बऱ्याचदा असे होते की, करिअर निवडताना गोष्ट बरेच जण करतायत म्हणून तेच आपल्यासाठी ठिक असेल असा विचार करत करिअरचे निर्णय घेतात, अनेक महत्वाच्या गोष्टी लक्षात घेत नाहीत. पुढे चार ते पाच वर्ष त्या फिल्डमध्ये काम केल्यानंतर त्यांना वाटायला लागतं की आपण चुकीच्या क्षेत्रात  काम करतोय आणि हे काम आपल्याला तेवढ आवडत नाहीये. मग पुन्हा काहीजण करिअर स्विच करण्याचा विचार करतात. पण ते तेवढं सोप्प राहात नाही. तर बरेच जण तेच काम आयुष्यभर करत राहातात, काम करतेवेळी मिळणारा आनंद हरवून बसतात. 

जर तुम्हाला वाटत असेल की भविष्यात अशी वेळ तुमच्यावर येऊ नये तर करिअर निवडतान सुरुवातीलाच प्रत्येक छोट्यातील छोट्या गोष्टीचा विचार करणे गरजेचे असते. आज आपण असाच करिअर निवडाना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या याविषयी जाणून घेणार आहोत. 

करिअर निवडताना आधी विचार करा

अधिकतर स्त्रीया या त्यांच्या सभोवताली यशस्वी झालेल्या महिलांकडून प्रेरणा घेताना दिसतात. त्यांना वाटायला लागते की दुसरे कोणीतरी ज्या फिल्डमध्ये यशस्वी झाले आहे त्याच फिल्डमध्ये करिअरसाठी चांगला स्कोप आहे आणि त्याच क्षेत्रात करियर करणे सोपे जाईल. मग पुढचा मागचा कसलाही विचार न करता त्या करिअर कुठल्या क्षेत्रात करायचे ते ठरवून टाकतात. असा निर्णय घेणे तुम्हाला पुढील आयुष्यात महागात पडू शकते. त्यामुळे कोणीतरी यशस्वी झालं म्हणून तुम्ही देखील व्हाल हा विचार डोक्यातून बाहेर काढणे आवश्यक आहे. अशा वेळी विचार करा की, तुम्हाला कुठले काम करण्यात आनंद मिळतो, अशा प्रकारे तुम्हाला अशा क्षेत्रांची लिस्ट मिळून जाईल ज्या मध्ये तुम्हाला करियर घडवणे शक्य आहे. पण या प्रक्रियेत तुम्ही स्वतःशी प्रमाणिक राहणे तेवढेच आवश्यक आहे. 

स्वतःमधील क्षमता ओळखा

प्रत्येक वेगळ्या  क्षेत्रात चांगली कामगीरी करण्यासाठी वेगळे स्किल्स असणे गरजेचे असतात.असे बऱ्याचदा होतं की तुम्हाला एखादे क्षेत्र आवडते पण त्यामध्ये करियर करण्यासाठी लागणारे स्किल्स तुमच्याकडे नसतात. जसे की काही क्षेत्रात तुम्हाला रात्री उशीरापर्यंत काम करावे लागत असेल किंवा सत्तत प्रवास करावा लागत असेल. तर काही फिल्ड मध्ये नऊ ते पाच जॉब असेल. त्यामुळे तुम्हाला आधीच तुम्ही काय करु शकता याचा अंदाज असणे गरजेचे आहे. तुम्हाला आवडणाऱ्या जॉबसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टी आपल्याकडे आहेत का याचा विचार करुन मगच निर्णय घेणे योग्य राहिल. 

गरजे पडेल तेव्हा मदत घ्या..

सध्याच्या काळात वेळेसोबत दररोज नव्या करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शक्याता असते की तुम्ही गोंधळून जाल आणि करियर फिल्ड निवडू शकत नसाल. तर अशा वेळी प्रोफेशनल मदत घेणे योग्य राहते. एक करिअर काऊंसलर तुमच्या आवडी-निवडी, गरजा आणि तुमचे मार्क्स या सगळ्या गोष्टींच्या आधारावर तुमच्यासाठी बेस्ट काय असेल याबद्दल सल्ला देतो. त्यानंतर तुमच्यासाठी निर्णय घेणे सोपे होते. 

स्वतःला कामात चॅलेंज करत राहा..

जर तुम्हाला तुमचे काम कायमस्वरुपी आवडत राहावे असे वाटत असेल तर तुम्ही स्वतःला चॅलेंज करत राहाणे गरजेचे आहे, तुम्ही दररोज एकसारखेच काम करत राहाल तर नक्कीच एकदिवस तुम्हाला कंटाळा येईल आणि ते काम तुम्हाला नकोसे वाटायला लागेल.  म्हणून तुम्ही प्रत्येक दिवशी काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करता राहणे आवश्यक आहे. जर दररोज काही नवे करणे शक्य नसेल तर स्वतःसाठी काही गोल्स सेट करा, ज्यामुळे कामात तुमचा उत्साह टिकून राहील आणि तुम्ही यशस्वी होण्याकरिता अतिरिक्त मेहनत करत राहाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT