Rat Killing Job  google
एज्युकेशन जॉब्स

Rat Killing Job : या श्रीमंत शहरातले उंदीर मारा आणि कमवा १ कोटी रुपये

दिवसेंदिवस त्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. हे उंदीर अनेक आजार पसरवण्यासही कारणीभूत ठरत आहेत.

नमिता धुरी

मुंबई : कोणी साफसफाईच्या नोकऱ्या करतं तर कोणी अधिकारी पदावरच्या. पण काही नोकऱ्या अशा असतात ज्या ऐकूनच विचित्र वाटतात. अशीच एक नोकरी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात निघाली आहे. इथे कर्मचाऱ्यांना उंदीर मारण्यासाठी लाखो रुपये पगार मिळणार आहे. हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

१८व्या शतकापासूनच न्यूयॉर्कमध्ये उंदरांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस त्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. हे उंदीर अनेक आजार पसरवण्यासही कारणीभूत ठरत आहेत. आता त्यांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त वाढली आहे.

न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी डायरेक्टर ऑफ रेडेंट मिटिगेशन हे पद हटवले आहे. रेडेंट ही एक शास्त्रीय संज्ञा असून ती उंदरांसारख्या प्राण्यांना उद्देशून वापरली जाते.

उंदरांना मारणाऱ्या व्यक्तीकडे पदवी असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यक्तीला १ लाख २० हजार डॉलर ते १ लाख ७० हजार डॉलर वेतन मिळणार आहे. भारतीय चलनानुसार हे वेतन ९७ लाख ७० हजार रुपये ते १ कोटी ३८ लाख रुपये इतके असणार आहे. तसेच उंदरांची समस्या कायमस्वरुपी सुटू शकेल असा विषारी पदार्थ संबंधित व्यक्तीकडे असावा, अशीही अट ठेवण्यात आली आहे.

लोकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्यामुळे अशाप्रकारची नोकरी निर्माण करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वीची उंदरांची संख्या लक्षात घेता गेल्या ८ महिन्यांत उंदरांची संख्या ७० टक्क्यांनी वाढली आहे. मात्र उंदरांना मारण्यासाठी कोट्यवधी रुपये देण्याची ही कृती वाढत्या कचऱ्याच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी केली जात असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

रात्री ८नंतर फूटपाथवर कचरा फेकणाऱ्यांना दंड केला जाईल असाही नियम करण्यात आला आहे. दुपारी ४नंतर येथे कचरा उचलला जातो. २०१४च्या आकडेवारीनुसार न्यूयॉर्कमधील लोकसंख्येच्या दुप्पट उंदरांची संख्या आहे. येथे १.८ कोटी उंदीर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT