बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये मेकॅनिक, पेंटर व इतर पदांची मोठी भरती! esakal
एज्युकेशन जॉब्स

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये मेकॅनिक, पेंटर व इतर पदांची मोठी भरती!

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये मेकॅनिक, पेंटर व इतर पदांची मोठी भरती!

सकाळ वृत्तसेवा

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) मध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची बातमी.

सोलापूर : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (Border Road Organization - BRO) मध्ये सरकारी नोकरी (Government Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची बातमी. संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Defense) अंतर्गत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्समध्ये (General Reserve Engineer Force) 354 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. BRO ने जारी केलेल्या भरती (Recruitment) जाहिरातीनुसार वाहन मेकॅनिकची 293 पदे, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्टची 16 पदे, जनरल ग्रेड 33 पदे, मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) आणि 12 मल्टी स्किल्ड वर्कर (भोजनशाळा वेटर) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

असा करा अर्ज

बीआरओ भरती 2021 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अधिकृत वेबसाइट bro.gov.in वरून भरती अधिसूचना डाउनलोड करू शकतात. अर्जाचा फॉर्म भरतीच्या जाहिरातीतच दिला आहे. हा फॉर्म पूर्णपणे भरला पाहिजे आणि आवश्‍यक कागदपत्रांसह जोडला गेला पाहिजे तसेच नोंदणीकृत पोस्टाने पुढे दिलेल्या पत्त्यावर सबमिट केला पाहिजे (कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे - 411015). BRO अधिसूचनेनुसार, उमेदवारांना जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत त्यांचे अर्ज सादर करावे लागतील.

जाणून घ्या पात्रता व वयोमर्यादा

  • वाहन मेकॅनिक : मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक पास आणि मोटर वाहन / डिझेल / हीट इंजिनच्या मेकॅनिकचे प्रमाणपत्र. वय 18 ते 27 वर्षे.

  • ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट सामान्य ग्रेड : मान्यताप्राप्त बोर्डाकडून मॅट्रिक पास आणि अवजड मोटार वाहनाचा ड्रायव्हिंग लायसन्स. वय 18 ते 27 वर्षे.

  • मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) : मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक पास आणि ITI पेंटरचे प्रमाणपत्र. वय 18 ते 25 वर्षे.

  • मल्टी स्किल्ड वर्कर (भोजनशाळा वेटर) : मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक पास. वय 18 ते 25 वर्षे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT