Cambridge-International-School
Cambridge-International-School 
एज्युकेशन जॉब्स

‘लीडर’ तयार करणारी शिक्षणसंस्था (डॉ. धनंजय वर्णेकर)

डॉ. धनंजय वर्णेकर

२००९ मध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलची स्थापना करण्यात आली. करिअरच्या तीव्र स्पर्धेत तग धरून राहण्यासाठी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होणे गरजचे आहे. म्हणूनच केंब्रिज स्कूलने मागील वर्षापासून आधुनिक गुरूकुल पद्धतीचा अवलंब केला आहे.

विद्यार्थी चौकस, शोधक वृत्तीचा, सर्जनशील असेल, शिकलेल्या गोष्टींची त्याला जीवनाशी सांगड घालता येत असेल, तरच पुढच्या काळात टिकाव धरू शकणार आहे, त्यासाठी शालेय शिक्षणही तितकेच गुणवत्तापूर्ण असणे गरजेचे आहे. हीच दूरदृष्टी ठेवून अभ्यासाबरोबरच नेतृत्वगुणांचा विकास करण्यासाठी २००९ मध्ये केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलची स्थापना करण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण व पारंपरिक शिक्षण यांचा योग्य मेळ साधत केंब्रिज स्कूल आता गुरुकुल पद्धतीने मुलांना घडवित आहे.

दर्जेदार शिक्षणाची दूरदृष्टी ठेवून केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलची स्थापना २००९-१० मध्ये झाली. धडाडीचे आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राचीन भारतीय गुरू-शिष्य परंपरेला आधुनिकतेची जोड देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. दिवसेंदिवस मुलांमधील सहनशीलता कमी होत चालली आहे. त्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे. प्रयत्न, चिकाटी, येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छाशक्ती यातून गुरुकुल शिक्षण पद्धतीचा अवलंब क्रेंब्रिज स्कूलने केला आहे. मुलांमधील टॅलेंटला योग्य वयात योग्य दिशा दाखवली तर मुलं कधीच मागे पडणार नाहीत, म्हणूनच त्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम हे शाळेच्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमार्फत केले जाते. 

विद्यार्थिकेंद्रित अभ्यासक्रम 
एकात्मिक संशोधनावर आधारित आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम शाळेमार्फत राबविला जातो. त्याद्वारे भावी पिढीत नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, विद्यार्थी बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिकदृष्ट्या विकसित व्हावेत यासाठी प्रयत्न केला जातो. या अभ्यासक्रमाचा उपयोग प्रत्येक विद्यार्थ्याची नेमकी वैयक्तिक गरज कोणती आहे, त्याची समजून घेण्याची क्षमता किती आहे, त्याचा कल कोणता आहे, हे ओळखण्यासाठी होतो. त्याद्वारे त्यांच्यातील गुणांना ओळखून त्याला गती देण्याचा प्रयत्न केला जातो.

प्रत्येक मूल हे वेगळे आहे. प्रत्येक वयाची मुले वेगळी असतात. त्यांची विचार करण्याची पद्धत, शैक्षणिक गरजा भिन्न असतात. त्यामुळे वयानुसार गुरुकुल पद्धतीत प्राथमिक आणि माध्यमिक विभागासाठी वेगळ्या प्रकारच्या पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. शिकविणे आवडीचे व्हावे, यासाठी पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक व इंटरॲक्‍टिव्ह पद्धतींचाही वापर करण्यात येतो. तीव्र स्पर्धेत टिकाव धरून राहण्याचे मोठे आव्हान तरुण पिढीपुढे आहे. केवळ ज्ञान असणे पुरेसे नाही. ते ज्ञान जगाला दाखविण्यासाठी कौशल्य आणि आत्मविश्‍वास असणेही गरजेचे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता व कौशल्य केवळ गुणांच्या नव्हे, तर विविध पातळ्यांवर तपासता यावी, म्हणून विविध मूल्यांकन पद्धतींचाही वापर केला जातो. 

खेळातून शिक्षण 
प्राथमिक शिक्षण ही भावी आयुष्याच्या जडणघडणीचा पाया रचण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात. या अभ्यासक्रमाचा भर खेळातून शिक्षण या संकल्पनेवर आधारित आहे. शारीरिक, वैयक्तिक, सामाजिक, भावनिक विकासाबरोबरच साक्षरता, अंकगणित, चौकसबुद्धीद्वारे जगाची समज वाढविणे आणि कला, संगीत, नृत्य, खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जातो.

शाळेमध्ये जागतिक दर्जाचे अत्याधुनिक क्रीडासंकुल असल्याने मुलांना प्राथमिक शाळेपासूनच खेळ हा विषय सक्‍तीचा आहे. त्यामुळे मुलांमधील खेळाची आवड लक्षात घेऊन त्यांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षणही दिले जाते. क्रीडाविषयक विविध उपक्रम व कार्यशाळा शाळेमार्फत राबविले जातात. 

शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये 
शहरातील एकमेव आधुनिक क्रीडासंकुल
शालेय शिक्षणाबरोबरच स्पोर्टस, कला, संगीत, नाटक यांसारख्या कलाशिक्षणावर भर 
प्राथमिक शिक्षणाबरोबरच क्रीडा शिक्षण सक्तीचे 
अत्याधुनिक, सर्वसोयींसुविधांयुक्त लॅब, ग्रंथालय, वर्ग, क्रीडा व कला केंद्र 
प्राथमिक अभ्यासक्रमात रोबोटिक्‍स तंत्रज्ञानाचा समावेश 

रोबोटिक्‍स रिसर्च सेंटर 
बदलत्या काळाची गरज ओळखून केंब्रिज स्कूलने रोबोटिक्‍स रिसर्च सेंटर सुरू केले आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना रोबोट तंत्रज्ञान व रोबोट प्रोग्राम तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांना बेसिक लेवलपासून रोबोटिक्‍स तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते.  

शाळाबाह्य उपक्रम 
क्रिकेट आणि टेनिसचे प्रशिक्षण, सुसज्ज ग्राउंड
केंब्रिज कमांडो प्रशिक्षण 
खेळ आणि खेळाव्यतिरिक्त इतर कलेत रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण 
योगा आणि ध्यानधारणेचे प्रशिक्षण 
विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कौशल्य ओळखता यावे आणि संबंधित विषयाच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड व्हावी, यासाठी रोबोटिक्‍स, छायाचित्रण, ॲनिमेशन, खेळ यांच्या कार्यशाळा घेतल्या जातात.

मिळालेले पुरस्कार
शिक्षणात अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल आयएसए पुरस्कार 
राष्ट्रीय शिक्षण नेतृत्वगुण पुरस्कार

फक्त मार्क किंवा शिक्षण याचा विचार न करता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांच्यातील लीडरशिप स्कील वाढविणे, ही शाळेची जबाबदारी आहे.
- डॉ. धनंजय वर्णेकर, अध्यक्ष, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT