Learn business and job opportunities in the field of mechanical engineering
Learn business and job opportunities in the field of mechanical engineering 
एज्युकेशन जॉब्स

मॅकेनिकल इंजिनियरिंग क्षेत्रात करीअर करायचे आहे? 'या' आहेत व्यवसाय आणि नोकरीच्या संधी

प्रा. प्रज्ञा कोसबे (

आजचे युग हे संगणक आणि माहिती युग आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा याच शाखांकडे आहे. कोणालाही विचारले की तुम्ही कुठली शाखा निवडणार, तर उत्तर ठरलेले असते; ते म्हणजे संगणक किंवा त्याच्याशी निगडित कुठलीही शाखा चालेल. पण एवढ्या संख्येने विद्यार्थी एकाच शाखेत धाव घेत असतील, तर त्यात स्पर्धा किती वाढेल आणि संधी कितपत मिळतील, याचाही दूरदृष्टीने विचार करणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकी या पायाभूत शाखांकडे विद्यार्थी वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कळपासारखे एकाच दिशेने चालत न जाता डोळसपणे आपली आवड, क्षमता आणि भविष्यातील इतर शाखांमधील उपलब्ध संधी यांचा देखील विचार व्हावयास हवा.

यंत्र अभियांत्रिकी शाखेतील उपलब्ध संधी आणि भविष्य
यंत्र अभियांत्रिकी (मॅकेनिकल इंजीनियरिंग) ही शाखा प्रामुख्याने गतिशास्त्र (कायनामेटिक्स), संरचनात्मक विश्लेषण (स्ट्रकचरल अनालिसीस), उष्मगतिकी, (थर्मोडायनामिक्स), द्रवयांत्रिकी (फ्लुईड मेकेनीक्स), ऊर्जाक्षेत्र (पॉवर सेक्टर) ,रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग आणि वाहन उद्योग यांच्याशी निगडित क्षेत्रात संधी उपलब्ध करते. सद्यस्थितीत तांत्रिक प्रगतीमुळे या क्षेत्रातील संधी या अगणित आहेत. भारतातच नव्हे; तर परदेशात देखील संधी आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मॅकेनिकल क्षेत्राच्या निगडित सॉफ्टवेअरमधील संधी
सध्या कटिआ, प्रोई , हायपरमेश आणि एन्सिस यांसारखी अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. त्यामुळे डिझाईन आणि सिम्युलेशनमध्ये मेकॅनिकल अभियंत्यांशिवाय पर्याय नाही. कारण ही मुख्यत्वे मॅकेनिकलशी निगडित सॉफ्टवेअर आहेत. जे  मॅकेनिकल अभियंते व्हर्चुअल सिमुलेशन (आभासी प्रतिकृतीमध्ये पारंगत असतील, त्यांना नजीकच्या काळात विविध उद्योग क्षेत्रांमधून प्रचंड मागणी असणार आहे. कारण हे सॉफ्टवेअर उत्पादनाचे टप्पे (प्रॉडक्ट सायकल) कमी करणे,  अर्थात किंमत आणि वेळ कमी करण्याकरता उपयुक्त ठरतील .  आजकाल थ्रीडी प्रिंटिंग हा परवलीचा शब्द झाला आहे त्यामुळे या क्षेत्रात देखील अनेक संधी आहेत.

पुणे : कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्यालयच बंद; कारण...

डिझाईन आणि उत्पादन क्षेत्रातील संधी
इलेक्ट्रिक जनरेटर, इंजिन,  टरबाइन, रेफ्रिजरेटर, एयर कंडिशनर आणि इतर मशीन यांची डिझाईन आणि उत्पादन हे फक्त मॅकेनिकल अभियंता करू शकतात. त्याचप्रमाणे दैनंदिन 'इंडस्ट्री मेंटेनन्स'साठी सुद्धा मॅकेनिकल शिवाय पर्याय नाही. त्याचप्रमाणे हेल्थकेअर आणि वेगवेगळी उपकरणे आणि मशीन डिझाईन आणि उत्पादनक्षेत्रात देखील अनेक संधी दडलेल्या आहे. 

वाहन उद्योग क्षेत्रात महासंधी
भारतात आता वाहनांसाठी BS6 चे निकष लागू झालेले आहेत. हे निकष पूर्ण करण्यासाठी वाहन उत्पादनक्षेत्र, कार्यशाळा (वर्कशॉप) , असेंब्ली लाईन आणि इतर वाहन उद्योगाशी निगडीत क्षेत्रात कुशल कामगारांची गरज लागणार आहे. त्यामुळे आता वाहन उद्योगतील संधी या 15 ते 20 टक्क्यांनी वाढणार आहेत. सध्या पर्यावरण पूरक वाहनांची नितांत गरज आहे. त्यावर जगात भरपूर संशोधन सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संकरित वाहने (हायब्रीड व्हेईकल) आणि विद्युत वाहन (ईलेक्ट्रिक व्हेईकल्स) उद्योगात मेकॅनिकल अभियंत्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

ऑटोमेशन आणि रोबोटिक्स तसेच उर्जा क्षेत्रात संधी

इंडस्ट्री 4.0 हे इंटरनेट ऑफ़ थिंग्स, ऑटोमेशन, रोबोटिक्स यांचा मिलाफ आहे. इंडस्ट्री 4.0 मुळे येणाऱ्या काळात स्वयंचलन आणि यंत्रमानवशास्त्रमध्ये (ऑटोमेशन अँड रोबोटिक्स) देखील भरपूर संधी आहेत. पारंपारिक ऊर्जास्त्रोत हे संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यायी ऊर्जा क्षेत्रात देखील मॅकेनिकल अभियंत्यांची गरज आहे मॅकेनिकल इंजिनिअर असे इतर सॉफ्टवेअर शिकून संगणक क्षेत्राशी निगडित कंपनीत नोकरी मिळवू शकतात. मेकॅनिकल इंजिनियर हा इतर शाखांच्या तुलनेत स्वंयरोजगार निर्माण करू शकतो.  2016 मधील सर्वेक्षणानुसार 2016 ते 2026 या कालावधीत मॅकेनिकल क्षेत्रातील संधी या नऊ टक्के वाढणार आहेत. त्यामुळे येणारा काळ हा मेकॅनिकल इंजिनिअरचा असणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सद्यस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास कोरोना विषाणूमुळे जग हे अत्यंत भयावह परिस्थिती मधून जात आहे. पण या परिस्थितीला समरप्रसंग की संधी समजायचे हे केवळ आपल्या हातात आहे. कोरोना विषाणूमुळे स्वयंचलन आणि यंत्रमानवशास्त्र क्षेत्रातील संधी वाढणार आहेत. त्याचप्रमाणे मेडिकल उपकरणे आणि मशीन यांचे डिझाईन आणि उत्पादन या क्षेत्रातदेखील अभियंत्यांना भरपूर वाव असणार आहे. अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले, तर थ्रीडी प्रिंटेड फेस शील्ड, पोर्टेबल व्हेंटिलेटर, प्रतिजैविक मुलामा कुठल्याही पृष्ठभागावर दिला, तर जिवाणू आणि विषाणू मारले जाऊ शकतील. या सर्व कारणांमुळे डिझाईन आणि उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय संधी निश्चितच वाढणार आहेत. त्यामुळे भविष्यकाळाची दिशा लक्षात घेता मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा एक उत्तम शैक्षणिक पर्याय म्हणून समोर येतो.

प्रा. प्रज्ञा कोसबे (जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, हडपसर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT