EPFO
EPFO 
एज्युकेशन जॉब्स

वर्षाअखेरपर्यंत उरका EPFO​ संबंधित महत्त्वाची दोन कामे अन्यथा वाढेल चिंता

शरयू काकडे

-31 डिसेंबरपूर्वी EPFO ​​च्या सदस्यांनी UAN क्रमांक आधार नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे.

- EPF सदस्यांना 31 डिसेंबरपूर्वी नॉमिनी म्हणजे वारसदार निवडणे गरजेचे आहे.

PFO UAN AADHAR LINK : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees' Provident Fund Organization) ईपीएफ (Employees' Provident Fund)सदस्यांना 31 डिसेंबरपूर्वी दोन महत्त्वाची कामी करायला हवी अन्यथा त्यांचे खूप नुकसान होऊ शकते.

ईपीएफ अकाउंट आधार कार्डाला लिंक करणे अनिवार्य असून त्याची शेवटची मुदत आता सदस्य 31 डिसेंबर 2021 पर्यंत आहे. तसेच EPF सदस्यांना 31 डिसेंबरपूर्वी नॉमिनी म्हणजे वारसदार निवडणे गरजेचे आहे. या दोन्ही कामांना विलंब केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.

सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत असणाऱ्या EPFOने EPFखातं आधारशी लिंक करणं करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता सर्व खातेधारकांचा UAN व्हेरिफाय असणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचं EPFO खातं 31 डिसेंबरपर्यंत आधारशी लिंक करू शकला नाही, तर कंपनीच्या वतीने तुमच्या खात्यात जमा होणारा पीएफ स्थगित केला जाईल तसे खात्यातील पैसे काढण्यासाठी देखील अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळए तुमच EPF खातं त्वरित आधार (UAN)सोबत लिंक करा. त्यासाठी तुम्ही घरबसल्या EPFOच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, तुमचं आधार कार्ड लिंक करून घेऊ शकता.

EPFO खातं आधार कार्डाशी कसं लिंक कराल?

सर्वात आधी EPFO ची अधिकृत वेबसाईट epfindia.gov.in ला भेट द्या. तुमचं अकाउंट लॉग इन करा. त्यानंतर 'ऑनलाइन सेवा' पर्याय क्लिक करा. नंतर 'ई-केवायसी पोर्टल' वर जाऊन, Link UAN Aadhaar या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमचा UAN क्रमांक आणि रजिस्टर मोबाईल नंबर प्रविष्ट करा. मोबाईल नंबर तिथे प्रविष्ट केल्यानंतर त्या नंबरवर OTP येईल. तिथे ओटीपी आणि आधार नंबर तिथे टाका. यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा आणि ओटीपी व्हेरिफिकेशन करून घेऊन तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा. यानंतर, EPFO कडून आधार-ईपीएफ अकाउंट लिंकिंग ऑथन्टिकेशनसाठी तुम्ही काम करत असलेल्या कंपनीशी संपर्क साधला जाईल. तुमच्या कंपनीकडून आधारला ईपीएफ अकाउंटशी जोडण्यासाठी व्हेरिफिकेशन मिळाल्यानंतर अकाउंट आधार कार्डाशी जोडलं जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचं EPFO खातं आधारशी लिंक केलं जाईल.

जर तुम्ही EPFO सदस्य असाल तर तुम्हाला वारसदार संबधीत माहिती असणे आवश्यक आहे. EPFसदस्यांना लवकरात लवकर EPFO खात्यासाठी वारसदार (Nominee)निवडणे गरजेचे आहे कारण त्यासाठी दिलेली मुदत 31 डिसेंबरला संपणार आहे.

जर तुम्ही वारसदाराचे नाव अपडेट केले नाही तर तुम्हाला काही सुविधांचा लाभ घेता येणार नाही, त्यामध्ये पेंशन आणि इंश्योरेन्स मनी सारख्या सुविधा देखील समाविष्ठ आहे. जर पीएफ सदस्याचा मृत्यू झाला तर फक्त त्याच्या वारसदारालाच अधिकार असतो तो त्या खात्यातून पैसे काढू शकतो. PFसदस्यांना अधिकार असतो की ते वारसदार म्हणून एकापेक्षा जास्त लोकांचा समावेश करू शकतात. तेच मल्टीपल नॉमिनीसंबधिती सर्व सदस्यांचा वाटा आधीच ठरवली जाते. वारसदाराची नोंदणी करणे घरबसल्या करणे शक्य आहे पण त्यासाठी फक्त UANनंबर लिंक असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमचा आधार युनिवर्सल अंकाऊट नंबर पीएफ अकाऊंटसोबत लिंक असणे आवश्यक आहे.

EDLI स्कीमचा लाभ मिळणार नाही.

या वर्षी मे महिन्यांमध्ये EPFO ने EDLIची(Employee Deposit Linked Insurance)लिमिट वाढवली असून ७ लाख रुपये केली आहे. EDLI स्किम अंतर्गत जर पीएफ सदस्याचा मृत्यू झाल्यास वारसदाराला ही एकरकमी रक्कम मिळते. पण,या काळात पीएफ सदस्य सेवेत असणे गरजेचे आहे. या स्किम अंतर्गत कमीत कमी इंश्योरंसची रक्कम २.५ लाख रूपये इतकी आहे.

वारसदाराची माहिती कशी कराल अपडेट जाणून घ्या

  • सर्वात आधी EPFOच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यांनतर तुमच्या अंकाऊट लॉग ईन करा.

  • त्यानंतर View ऑप्शनवर क्लिक करून प्रोफाईलवर जा. तिथे पीएफ सदस्यांची सर्व माहिती असते. सर्व माहिती बरोबर आहे ना हे तपासून घ्या.

  • सर्व माहिती बरोबर असेल तर Manageया पर्यायवर किल्क करा आणि तिथे इ- नॉमिनेशनचा पर्याय क्लिक करा. येथे प्रोफाईल सुरु होते जे प्रोसीड करायला हवे.

  • नवीन पेज सुरु करा जिथे Family Declarationवर हो (Yes)किंवा नाही (N0)असा पर्याय आहे. Yes या पर्यायवर क्लिक करा ज्यानंतर नवीन पेज सुरू होईल.

  • नवीन पेजववर Add Family Details च्या पर्यायवर क्लिक करा. तिथे आधार, नाव, जन्मदिनांक, जेंडर, रिलेशन, पत्ता, अकाऊंटची माहिती, फोटोसहित सर्व माहिती शेअर करावी लागेल.

  • जर तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी बनु इच्छित असाल तर Add New या पर्यायावर क्लिक करा. जर एक नॉमिनी ठेवयाचा असेली तर सेव पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे EPS म्हणजेच पेंशनच्या ठिकाणी एक नॉमिनी अॅड करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: आवेशने एकाच ओव्हरमध्ये पंजाबला दिले दुहेरी धक्के! धोकादायक रुसो पाठोपाठ शशांक सिंगही परतला माघारी

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT