ITI Courses esakal
एज्युकेशन जॉब्स

ITI मध्ये स्थानिकांना 90 टक्के प्रवेश

पांडुरंग बर्गे

कोरेगाव (सातारा) : शासनाने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत (Industrial Training Institute Courses) (आयटीआय) केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबवताना त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थ्यांना यंदा ७० ऐवजी ९०, तर परजिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना ३० ऐवजी दहा टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण ११ तालुक्यांतील ११ शासकीय आयटीआयमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी गुरुवारपासून (ता. १५) ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. (Local Students Will Get 90 Percent Admission In ITI bam92)

आयटीआयची (ITI) प्रवेशप्रक्रिया ही गुणवत्तेनुसार सुरू केल्यामुळे कुठल्याही जिल्ह्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना कोणत्‍या‍ही जिल्ह्यात ३० टक्के जागांवर प्रवेश मिळत होता.

शासनाने शहरी आणि ग्रामीण भागातील युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन छोटा-मोठा उद्योग उभारून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे किवा औद्योगिक वसाहतींमध्ये नोकरी मिळून रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने सुरुवातीला प्रामुख्याने जिल्हानिहाय, नंतर तालुकानिहाय आयटीआय सुरू केल्या. या सर्व आयटीआयमधे मख्यत्वे त्या-त्या जिल्ह्यातील, नंतर त्या-त्या तालुक्यांतील स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे. बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना काही जागा राखीव असत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून आयटीआयमधे त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के, तर परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

आयटीआयची प्रवेशप्रक्रिया ही गुणवत्तेनुसार सुरू केल्यामुळे कुठल्याही जिल्ह्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना कोणत्‍या‍ही जिल्ह्यात ३० टक्के जागांवर प्रवेश मिळत होता. परिणामी स्थानिक व तुलनेत थोडी कमी गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक संस्थांत प्रवेश मिळण्यात अडचणी येत असत. परिणामी असे विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहात होते. पर्याय म्हणून त्यांना खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत प्रवेश घ्यावा लागत होता. त्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. तसेच खासगी प्रशिक्षण संस्थांमधून प्रशिक्षण घेतलेल्यांचा शासकीय नोकरीत फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे स्थानिक पण तुलनेत थोडी गुणवत्ता कमी असलेल्या विद्यार्थ्यांची खूप कुचंबणा होत होती.

अशा पार्श्वभूमीवर शासनाने यंदा शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेपासूनच त्या-त्या जिल्ह्यातील आयटीआयमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना ९० तर परजिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना दहा टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अधिकाधिक स्थानिक विद्यार्थ्यांना जिल्ह्यातीलच संस्थांत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्‍या जिल्ह्यात तालुकानिहाय एक म्हणजे ११ तालुक्यांत ११ शासकीय आयटीआय आहेत. त्यात एकूण तीन हजार २३६ जागा असून, सर्वाधिक जागा कऱ्हाड आयटीआयमध्ये ९००, तर सर्वांत कमी जागा फलटण आयटीआयमध्ये १०४ आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय ११ आयटीआयमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागा

तालुका उपलब्ध जागा

  • सातारा ८७६

  • कऱ्हाड ९००

  • वाई २१२

  • फलटण १०४

  • जावळी (मेढा) १५२

  • खंडाळा (लोणंद) २९२

  • माण (दहिवडी) १०८

  • खटाव (औंध) १४४

  • कोरेगाव १९२

  • पाटण (येराड) १४८

  • महाबळेश्वर १०८

  • (गोडवली पाचगणी)

आयटीआय प्रवेशासाठी...

admission.dvet.gov.in या वेबसाईटवर (संकेतस्थळ) भेट देऊन ऑनलाइन प्रवेश अर्ज आणि शुल्क भरून प्रवेश निश्चित करा. त्याबरोबर व्यवसाय आणि आयटीआय निवडीसाठी Option Form भरा.

Local Students Will Get 90 Percent Admission In ITI bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT