Student sakal media
एज्युकेशन जॉब्स

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर, 99.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

नामदेव कुंभार

Maharashtra HSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (HSC Result 2021) बारावीचा निकाल लागला आहे. राज्याचा बारावीचा निकाल 99.63 टक्के लागल्याची माहिती, बोर्डाकडून देण्यात आली आहे. दुपारी चार वाजता विद्यार्थांना प्रत्याक्षात निकाल पाहाता येणार आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के, कला शाखेचा निकाल 99.83 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 99.91 टक्के लागला आहे.

दहावीप्रमाणेच बारावीचा निकाल विक्रमी लागला आहे. राज्यातील ४६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर ० टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या यंदा एकही नाही. गतवर्षीप्रमाणे निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे....

निकालाची विभागवार टक्केवारी

१) कोकण : ९९.८१

२) मुंबई : ९९.७९

३) पुणे : ९९.७५

४) कोल्हापूर : ९९.६७

५) लातूर : ९९.६५

६) नागपूर : ९९.६२

७) नाशिक : ९९.६१

८) अमरावती : ९९.३७

९) औरंगाबाद : ९९.३४

निकाल पाहण्यासाठी लिंक

१) https://hscresult.11thadmission.org.in

२) https://msbshse.co.in

३) hscresult.mkcl.org

४) mahresult.nic.in

आक्षेप, तक्रारी विभागीय मंडळाकडे नोंदवा

सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर केलेल्या बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांचे आक्षेप, तक्रारी नोंदविण्यासाठी आणि त्यांचे निराकरणासाठी राज्य मंडळामार्फत संबंधित विभागीय मंडळ स्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यासाठी विभागीय मंडळातील विभागीय सहसचिव हे तक्रार निवारण अधिकारी म्हणून काम पाहतील. संबंधित विद्यार्थी आपला तक्रार अर्ज टपाल, ई-मेल किंवा व्यक्तिशः भेटून संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करू शकतात. अर्जाचा नमुना ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तक्रार निवारण अधिकारी कार्यालयीन कामाच्या दहा दिवसांत अर्ज निकाल काढून विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण करतील. विद्यार्थ्यांना उत्तराबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित विभागीय मंडळातील विभागीय सचिव, विभागीय अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शतक झळकावल्यावर विराट कोहलीचा मैदानावर नागीण डान्स, Video होतोय तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : तपोवiनातील वृक्षतोडीविरोधात सीटू संघटना आक्रमक; आंदोलनाला मिळतोय वाढता पाठिंबा

Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन; ज्येष्ठ वकील, माजी राज्यपाल अन्... 'अशी' होती कारकिर्द

Bharat Taxi Launch : झिरो कमिशनसोबत ‘भारत टॅक्सी’ सेवा लॉन्च; मिळणार अल्प दरात राइड्स, जाणून घ्या दर आणि बुकिंग प्रक्रिया

Ashes: मिचेल स्टार्कनं इतिहास घडवला; हॅरी ब्रुकची विकेट घेऊन वसिम अक्रमचा विक्रम मोडला, पाकिस्तानी दिग्गज म्हणाला...

SCROLL FOR NEXT