maharashtra hsc exam start today maharashtra hsc 2023 exam news update  esakal
एज्युकेशन जॉब्स

All The Best : आजपासून १२वीच्या परक्षेला सुरूवात! १४ लाखांहून अधिक विद्यार्थी देणार पेपर

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra HSC Exam Start Today : आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. १२वीची लेखी आजपासून सुरू होऊन २१ मार्च पर्यंत पार पडेल. तब्बल १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही आत्तापर्यंत ची सर्वाधिक संख्या आहे.

परीक्षेसाठी सकाळी सत्रातील परीक्षा ११ वाजता सुरू होईल. यासाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे १०:३० वाजता हजर राहायचं आहे तर दुपारची सत्रातील परीक्षा ३ वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्र उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे.

दरम्यान यंदा होत असलेली १२ वीची ही परीक्षा ३१९५ मुख्य केंद्रावर ही पार पडेल. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या ६,६४,४६१ इतकी आहे. तर मुलांची संख्या ७ लाखांवर आहे.

या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर या वर्षी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. भरारी पथक आणि बैठी पथक केंद्रांवर असणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटी १० मिनीटे वाढवून देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तयारी पूर्ण करण्यात आली. प्रत्येक केंद्रावर ५० मीटर अंतरावर कुठल्या ही व्यक्तीला विद्यार्थी व्यतिरिक्त कोणाला ही फिरायला परवानगी देण्यात येणार नाही. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रापासून ५० मीटर अंतरावर झेरॉक्स चे दुकान बंद ठेवण्यात येणार आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव पेपर कस्टडी नेताना जीपीएस लावण्यात येणार आहे. उच्च शिक्षण विभाग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप असला तरी सुद्धा १२ वीचा प्रॅक्टिकल पेपर पार पडले आहेत. तसेच कुठले ही कॉलेज राहिले असतील तर थेरी नंतर प्रॅक्टिकल देता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT