Maharashtra State Examination Council Final answer sheets of NMMS exam announced 8th standard pune  sakal
एज्युकेशन जॉब्स

‘एनएमएमएस’ परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता ८ साठी घेतलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) १९ जून २०२१ रोजी घेण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता आठवीसाठी घेतलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) १९ जून २०२१ रोजी  घेण्यात आलेली होती. या परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या ‘www.mscepune.in/’ आणि ‘https://nmmsmsce.in/’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

‘एनएमएमएस’ या परीक्षेच्या मॅट आणि सॅट पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे ४ जुलैपर्यंत पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन आणि आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. तसेच या परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही, याची मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी नोंद घ्यावी. या अंतिम उत्तरसूचीनंतर एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे दराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Match Fixing : भारतीय क्रिकेटवर पुन्हा मॅच फिक्सिंगचे सावट; चार खेळाडू निलंबित, नेमकं काय घडतंय?

Mickey Mouse: ‘मिकी माउस’ आता ‘सोरा एआय’वर; ‘ओपन एआय’मध्ये ‘डिस्ने’कडून एक अब्ज डॉलरची गुंतवणूक

MPSC and NET Exam : ‘एमपीएससी’, ‘नेट’ एकाच दिवशी; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी अन्‌ परीक्षेबाबत संभ्रम

Mango Seed Oil : आता 'हापूस'च्या कोयींपासून तयार होणार तेल अन् मँगो बटर; राजापुरात संशोधनाची कमाल, 'अशी' केली तेलनिर्मिती

Sahyadri Express : कोल्हापूर–मुंबई प्रवासासाठी हक्काची गाडी हरवली; सह्याद्री एक्स्प्रेसच्या विस्तारावर रेल्वेची उदासीन भूमिका

SCROLL FOR NEXT