Public Speaking Sakal
एज्युकेशन जॉब्स

स्किल्स बकेट : पब्लिक स्पीकिंग

तुम्हाला अभ्यासक्रम कोणताही करायचा असो, पब्लिक स्पीकिंग म्हणजे मोठ्या समूहापुढे बोलण्याची क्षमता हे कौशल्य तुमच्याजवळ असलं, तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता.

मंदार कुलकर्णी

तुम्हाला अभ्यासक्रम कोणताही करायचा असो, पब्लिक स्पीकिंग म्हणजे मोठ्या समूहापुढे बोलण्याची क्षमता हे कौशल्य तुमच्याजवळ असलं, तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता.

तुम्हाला अभ्यासक्रम कोणताही करायचा असो, पब्लिक स्पीकिंग म्हणजे मोठ्या समूहापुढे बोलण्याची क्षमता हे कौशल्य तुमच्याजवळ असलं, तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला वकील बनायचं असेल, तर कायद्यांचा अभ्यास ही गोष्ट जितकी महत्त्वाची, तितकंच उत्तम वक्तृत्व तुमच्याकडे असणं हेही गरजेचं. तुम्हाला परकीय भाषांमध्ये करिअर करायचं असेल, तर त्या भाषांवरच्या प्रभुत्वाबरोबरच मुळात स्टेज डेअरिंग, संवादकौशल्य या क्षमता असतील तर तुम्ही त्यात परकीय भाषेच्या ज्ञानानं नवीन आयाम देऊ शकता. व्यवस्थापनशास्त्र, संरक्षणशास्त्र अशा अभ्यासक्रमांनंतर तर एकाच वेळी अनेकांशी संवाद साधायची वेळ अनेकदा येऊ शकते, त्यामुळे तिथं तर पब्लिक स्पीकिंगचं कौशल्य अपरिहार्यच असतं.

इतकंच कशाला, वैद्यकीयसारख्या अभ्यासक्रमामध्येही किंवा नंतर डॉक्टर झाल्यावरही अनेकदा सार्वजनिक मंचांवर बोलण्याची वेळ येत असते. त्यामुळे पब्लिक स्पीकिंग हे कौशल्य विकसित करणं अतिशय महत्त्वाचं. आज अनेक विद्यार्थी नेहमीचे पदवी अभ्यासक्रम करताना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची इच्छा मनात बाळगून असतात. आता प्रशासकीय अधिकारी व्हायची इच्छा असेल, तर तिथं सार्वजनिक संवादामध्ये हातखंडा असणं आवश्यक असल्यामुळे अशा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या अनेक संस्थांमध्येदेखील पब्लिक स्पीकिंगची विशेष तयारी करून घेतली जाते. बहुतेक सर्व महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्याचबरोबर विविध सांस्कृतिक, करमणूकपर, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांचं सूत्रसंचालन विद्यार्थ्यांकडेच सोपवलं जातं आणि अशा प्रकारे आपली छाप पाडणारे विद्यार्थी इतरांच्या पुढे जातात, हेही स्पष्ट आहे.

त्यामुळेच तुम्ही पुढे काहीही बनायचं ठरवलं असो, कोणत्याही अभ्यासक्रम करण्याचं मनात असो-पब्लिक स्पीकिंगचं कौशल्य तुम्ही विकसित केलंच पाहिजे. हे कौशल्य अचानक विकसित होत नाही, तर तेही नववी ते बारावी या ड्रीम इअर्समध्येच जास्त चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतं. हे कौशल्य विकसित करण्यासाठी जास्तीत जास्त वक्तृत्व, वाद आणि इतर स्पर्धांमध्ये भाग घ्या, वर्गात शिक्षकांनी इतरांपुढे काही बोलायला सांगितलं तर ती संधी लगेच स्वीकारा, कोणत्याही प्रकारच्या सादरीकरणात रंजकता कशी आणता येईल याचा सतत प्रयत्न करा. यातून हे कौशल्य विकसित होत जाईल. एकदा स्टेज डेअरिंग आलं, की मग नंतर आपलं भाषण, निवेदन हे जास्तीत जास्त प्रभावी कसं करता येईल यावर तुम्ही काम करू शकता. आणि हो, फक्त इतर अभ्यासक्रमांना पूरक म्हणूनच पब्लिक स्पीकिंगचा उपयोग होतो असं नाही, तर पब्लिक स्पीकिंगमध्ये तुम्ही खूप पुढे गेलात, तर त्याच्याशी संबंधित इतर करिअरचाही खजिनाच तुमच्यापुढे उभा राहतो हेही लक्षात ठेवा!

हे नक्की करा!

  • शाळा, महाविद्यालयांतील वक्तृत्व, वादविवाद आणि संबंधित स्पर्धांमध्ये जरूर भाग घ्या.

  • आधी स्टेज डेअरिंग विकसित करा. नंतर भाषणं जास्तीत जास्त रंजक करण्यासाठी प्रयत्न करा.

  • युट्यूबवर विविध प्रभावी वक्त्यांचे व्हिडिओ पाहा आणि त्यातले कोणते घटक आपल्या भाषणात, वक्तृत्वात आणता येतील त्याचा प्रयत्न करा.

  • वेगवेगळे विषय घेऊन स्वतःच आरशासमोर छोटी भाषणं करून पाहण्याची सवय अंगी बाणवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT