E-commerce 
एज्युकेशन जॉब्स

ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये करियरच्या अनेक संधी’

सकाळ वृ्त्तसेवा

पुणे : ‘‘कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ‘ई कॉमर्स’ आणि ‘लॉजस्टिक’ क्षेत्रांचा उद्योगातील वाटा वाढत आहे. या क्षेत्रात करियरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत,’’ असे मत नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएसडीसी) डॉ. गणेशन यांनी व्यक्त केले.

बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने (बीएमसीसी) बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘ई -कॉमर्स क्षेत्रातील संधी’ विषयावर ते होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, दलित इंडस्ट्री आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक मिलिंद कांबळे, एनएसडीसीचे रमेश व्यंकट, बीएमसीसीच्या प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित आदी उपस्थित होते.

डॉ. गणेशन म्हणाले, ‘‘बीएमसीसीत एनएसडीसीच्या सहकार्याने सुरू केलेला बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस) हा अभ्यासक्रम ई-कॉमर्स क्षेत्रातील करियरसाठी उपयुक्त आहे. या क्षेत्रातील अभ्यासक्रमासह एका वर्षाच्या नामांकित कंपनीतील अप्रेंटिसमुळे प्रात्यक्षिकांचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे.’’

डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम महत्त्वाचे असून, त्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात.’’ व्यंकट म्हणाले, ‘‘ई -कॉमर्स क्षेत्र वेगाने विकसित होत असून त्यात करिअर करण्यासाठी दृष्टिकोन, कौशल्य आणि या क्षेत्रातील ज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT