Maha_Metro 
एज्युकेशन जॉब्स

Maha Metro Jobs: महा मेट्रोमध्ये विविध पदांची भरती; पगार १.२५ लाखापर्यंत!

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Metro Rail Recruitment 2021: पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मधील तंत्रज्ञांसह इतर अनेक पदांवर भरती करण्यात येणार आहे. या सरकारी नोकरीची अधिसूचना अधिकृत वेबसाइट mahametro.org वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदांचा तपशील आणि अधिसूचनाबाबतची अधिक माहिती पुढे दिली आहे.

पदांची माहिती - 
तंत्रज्ञ (टेक्निशियन) - इलेक्ट्रिकल, फिटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन - एकूण ५३ पदे (वेतन - दरमहा २०,००० ते ६०,००० रुपये)
- स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर - एकूण ५६ पदे (वेतन - दरमहा ३३००० ते १ लाख)
- सेक्शन इंजिनीयर (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी) - ११ पदे (वेतन - दरमहा ४०,००० ते १.२५ लाख)
- कनिष्ठ अभियंता (ज्यूनियर इंजिनीयर) - (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकेनिकल, सिव्हिल) - १९ पदे (वेतन - ३३००० ते दरमहा १ लाख रुपये)

पात्रता -

तंत्रज्ञ - १० उत्तीर्ण उमेदवार ज्यांनी एनसीव्हीटी/एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या पदासाठी १८ ते २५ वर्षे वयोमर्यादा आहे. 

स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / ट्रेन कंट्रोलर आणि ज्युनियर इंजिनीयर - शासकीय मान्यताप्राप्त संस्थेमधून तीन वर्षांची संबंधित ट्रेडमधून इंजिनिअरिंग. या पदासाठी १८ ते २८ वर्षे वयोमर्यादा आहे.

सेक्शन इंजिनीयर - मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडची चार वर्ष बीई किंवा बीटेक पदवी. या पदासाठी १८ ते २८ वर्षे वयोमर्यादा आहे. 

- महत्त्वाचे म्हणजे, आरक्षित वर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे.

असा करा अर्ज -
वरील सर्व पदांसाठी महाराष्ट्र मेट्रोची वेबसाइट (mahametro.org) वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज १४ डिसेंबर २०२० पासून सुरू झाले असून २१ जानेवारी २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

- सर्व पदांसाठी सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी ४०० रुपये आहे. अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५० आहे.

कशी होणार निवड?
तंत्रज्ञांच्या पदांची निवड केवळ लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. तर इतर पदांसाठीची निवड संगणक आधारित लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

महत्त्वाच्या लिंक - 
- महा मेट्रो रिक्त पदांची (टेक्निशिअन) अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
- इतर रिक्त पदांची अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा
- महा मेट्रोच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT