MPSC Exam Sayali Phasake  esakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC Exam : कृषी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; महिला प्रवर्गातून कागलच्या सायली फासके राज्यात प्रथम

सायली फासके (Sayali Phasake) यांचे वडील प्राथमिक शिक्षक, तर आई गृहिणी आहे.

सकाळ डिजिटल टीम

२०२० पासून त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. त्यांना दुसऱ्या प्रयत्नात कृषी सेवा परीक्षेत यश मिळाले आहे.

बिद्री : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा (Agricultural Services Examination) अंतिम निकाल जाहीर झाला. यात उंदरवाडी (ता. कागल) येथील सायली साताप्पा फासके या महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम आल्या. एमपीएससीच्या वतीने कृषी सेवा २०० जागांसाठी जाहिरात करण्यात आली. मे २०२३ मध्ये मुख्य परीक्षा झाली. त्यानंतर ऑगस्टमध्ये मुलाखतीची प्रक्रिया पार पडली, त्यानंतर ९ मे २०२४ रोजी अंतिम निकाल जाहीर झाला आहे.

सायली फासके (Sayali Phasake) यांचे वडील प्राथमिक शिक्षक, तर आई गृहिणी आहे. उंदरवाडीतील प्राथमिक विद्यामंदिर मध्ये त्यांचे शालेय शिक्षण व प.बा. पाटील हायस्कूल मुदाळतिठ्ठा येथे हायस्कूलचे शिक्षण झाले. बारावीचे कोल्हापुरात शिक्षण न्यू कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेतले व त्या सध्या राहुरीमध्ये त्या एमएस्सी करीत आहेत.

२०२० पासून त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. त्यांना दुसऱ्या प्रयत्नात कृषी सेवा परीक्षेत यश मिळाले आहे. मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहावे ही अपेक्षा त्यांच्या वडिलांची होती. ‘यश मिळाले व राज्यात पहिल्या येण्याचा मान मिळाला याचा आनंद आहे, पुढील काळात संधी अधिकारी होण्याची इच्छा आहे, असे सायली दै. सकाळशी बोलताना म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT