neet exam 2021 neet exam 2021
एज्युकेशन जॉब्स

NEET Exam 2021: ‘नीट’ला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नीट ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. यंदा कोरोनाचे संकट असल्याने या परीक्षेविषयी विद्यार्थ्यांत संभ्रम होता. पण, केंद्र शासनाने या परीक्षेची प्रक्रिया सुरु केली आहे

सकाळ वृत्तसेवा

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नीट ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. यंदा कोरोनाचे संकट असल्याने या परीक्षेविषयी विद्यार्थ्यांत संभ्रम होता. पण, केंद्र शासनाने या परीक्षेची प्रक्रिया सुरु केली आहे

लातूर: वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नीट परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा कधी होणार? कशी होणार? परीक्षेसाठी अर्ज कधी स्वीकारले जाणार, हे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होते. पण, केंद्र शासनाने या परीक्षेची प्रक्रिया सुरु केली आहे. या नीट परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरीता केंद्र शासनाने मुदतवाढ दिली असून ता. दहा ऑगस्टपर्यंत हे अर्ज भरता येणार आहेत.

या संदर्भात केंद्र शासनाने मंगळवारी (ता. तीन) नोटिफिकेशन काढले आहे. या वर्षी देखील कोरोनाचे संकट सर्वांसमोर होते. त्यात बारावीची परीक्षा होवू शकली नाही. महाविद्यालये बंद राहिली. मूल्यांकनावर बारावीचा निकालही लावण्यात आला. पण, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न हजारो विद्यार्थी उराशी बाळगून आहेत. महाविद्यालयाचे तसेच खासगी क्लासेसचे ऑनलाइन मार्गदर्शन घेत हे विद्यार्थी परीक्षेची तयारी करीत आहेत. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने नीट ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. यंदा कोरोनाचे संकट असल्याने या परीक्षेविषयी विद्यार्थ्यांत संभ्रम होता. पण, केंद्र शासनाने या परीक्षेची प्रक्रिया सुरु केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरीता सहा ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. आता ती वाढवण्यात आली आहे. दहा ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज भरता येणार आहेत. एमबीबीएस, बीएएमएस सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमासोबतच बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाचे प्रवेश सुद्धा या नीट परीक्षेतील गुणवत्तेवरच होणार आहेत.

केंद्र शासनाच्या वतीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १२ सप्टेंबर रोजी नीटची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारावर एमबीबीएस, बीडीएस सोबतच बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, बीपीओ व बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमांचे प्रवेश होणार आहे. त्यामुळे वरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेचे फॉर्म भरणे गरजेचे आहे. बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुद्धा नीट या परीक्षेच्या आधारावर होणार आहेत. या आशयाचे नोटिफिकेशन नव्याने आल्यामुळे परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवून १० ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहे. याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा.
-सचिन बांगड, प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक, लातूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT