neet exam 2021 result esakal
एज्युकेशन जॉब्स

बहुप्रतिक्षित NEET परीक्षेचा निकाल जाहीर

अरूण मलाणी

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष पदवीच्‍या प्रवेशाकरीता नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एन्‍ट्रान्‍स टेस्‍ट (NEET) परीक्षा घेण्यात आली होती. या राष्ट्रीय स्‍तरावरील परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.१) सायंकाळी उशीरा जाहीर झाला.

संकेतस्‍थळाची गती मंदावली

विद्यार्थ्यांना ॲप्‍लीकेशन नंबर, जन्‍म तारीख, सेक्‍युरीटी पिन दाखल करुन निकाल बघण्याची सुविधा उपलब्‍ध असेल. दरम्‍यान एकाच वेळी लाखो विद्यार्थी संकेतस्‍थळाला भेट देत असल्‍याने संकेतस्‍थळाची गती मंदावली होती.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाचा मार्ग मोकळा

नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सीच्‍या माध्यमातून परीक्षेचे संयोजन केले होते. कोरोना (Corona) महामारीमुळे प्रभावित झालेली ही परीक्षा १२ सप्‍टेंबरला घेण्यात आली होती. वैद्यकीय शाखेतील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयुएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरेपी, बी.एस्सी.(नर्सिंग) सह अन्‍य शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची होती.

सोमवारी रात्री आठच्‍या सुमारास काही विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या ई-मेलवर निकालपत्र प्राप्त झाले. तर संकेतस्‍थळावरही निकाल पाहण्याची सुविधा एनटीएमार्फत उपलब्‍ध करुन दिली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍याने आता वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT