NEET UG 2022 Sakal
एज्युकेशन जॉब्स

NEET UG 2022: अधिसूचना कधी प्रसिद्ध होणार? अर्ज कसा करायचा,जाणून घ्या

NEET UG 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) पुढील आठवड्यात NEET UG, 2022 चे वेळापत्रक जाहीर करू शकते. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक NTA च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर प्रसिद्ध केले जाईल.

सकाळ डिजिटल टीम

NEET UG 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच NEET UG, 2022 साठी प्रवेश परीक्षेसाठी अधिसूचना जारी करू शकते. पुढील आठवड्यात अधिसूचना निघेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक NEET PG, 2022 चे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर होणं अपेक्षित होतं. परंतु NEET UG चे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे. शेड्युलला उशीर होण्याचे कारण काय आणि वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अर्जाची संपूर्ण प्रक्रिया काय असेल हे आज आपण पाहणार आहोत.

NEET UG 2022: वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होणार

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) पुढच्या आठवड्यात NEET UG, 2022 चे वेळापत्रक जारी करू शकते. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक NTA च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर प्रसिद्ध केले जाईल. या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्जही करता येणार आहेत. कोणतीही नवीन माहिती आणि अपडेटसाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.

NEET UG 2022: उशीर का होत आहे?

वास्तविक CBSE, ICSE आणि विविध राज्य मंडळे त्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करत आहेत. त्यामुळे या परीक्षांचा NEET UG, 2022 एकत्र होण्याची भीती बळावली आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही सुरू आहेत, त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. यामुळेच NEET UG, 2022 चे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे.

NEET UG 2022: जूनच्या शेवटी घेतली जाऊ शकते परीक्षा

विविध अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की NEET UG, 2022 परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केली जाऊ शकते. असे झाल्यास, ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील आणि काउंसलिंग प्रक्रिया सुरू होण्यासाठी सप्टेंबरपर्यंत लागू शकेल. परीक्षा ऑफलाईन (पेन-पेपर) पद्धतीने घेतली जाऊ शकते.

NEET UG 2022: या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश उपलब्ध

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच NEET UG, 2022 मध्ये रँक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना देशभरातील विविध वैद्यकीय संस्थांमध्ये MBBS, BDS, आयुष, BVSC आणि GIPMER इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जाईल. या अभ्यासक्रमांच्या जागांची संख्या पुढीलप्रमाणे आहे-

एमबीबीएस- 90,825

BDS- 27,948

आयुष- 52,720

BVSC - 603

GIPMER- 249

NEET UG 2022: शुल्क

येत्या अधिवेशनापासून सर्व खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील ५० टक्के जागांचे शुल्क सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांएवढे करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास असंख्य विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयात कॉलेजांकडून आकारण्यात येणाऱ्या कॅपिटेशन फीवरही बंदी घालण्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT