CBSE  sakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE: आता CBSE चं शिक्षण घेता येणार 22 भारतीय भाषांमध्ये, 28 हजार शाळांना जारी करण्यात आलेत आदेश

शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय. आता CBSE चा अभ्यास 22 भारतीय भाषांमध्ये करता येणार आहे. NCERT लवकरच पुस्तके डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे.

Aishwarya Musale

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सीबीएसईच्या शाळा फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये शिकवत होत्या. पण आता या शाळांमध्ये 22 भारतीय भाषांमध्ये अभ्यास करता येणार आहे.

शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव संजय कुमार म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पाचवीपर्यंतच्या मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकवले जाणार आहे. शिवाय नवीन अभ्यासक्रमानुसार NCERT सोबत हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव म्हणाले की आम्ही एनसीईआरटीला सांगितले आहे की, सीबीएसईचा संपूर्ण अभ्यासक्रम 22 भाषांमध्ये छापला जावा. या भाषांचा भारतीय राज्यघटनेच्या कलम 8 मध्ये उल्लेख आहे. यासंदर्भात सीबीएसईने आपल्या सर्व 28 हजार शाळांना आदेश जारी केला आहे.

मुलं आपल्या मातृभाषांमध्ये बोर्डाची परीक्षा देऊ शकतात, असं ही संजय कुमार यांनी सांगितले. यामुळे समानतेला चालना मिळेल. NCERT लवकरच ही पुस्तके डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे.

यावेळी संजय कुमार म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत घेण्यात आलेला हा निर्णय अत्यंत दूरगामी ठरणार आहे. माझ्या मते, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताच्या भविष्याचा डीएनए आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

SCROLL FOR NEXT