JEE Main esakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Main 2021 परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पहा निकाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टींग एजन्सीची जॉईंट एट्रन्स एक्झाम अर्थात जेईई मेन्स २०२१ सेशन ३ चा निकाल आज शुक्रवारी लागला आहे. या परिक्षेसाठी जवळपास सात लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. ही परिक्षा जुलै महिन्याच्या २०, २२, २५ आणि २७ तारखेला झाली होती. विद्यार्थी आपला निकाल jeemain.nta.nic.in. या साईटवर पाहू शकतात. जेईई मेन परीक्षा तिसऱ्या सत्राची अंतिम उत्तरतालिका (JEE Main Exam Final Answer Key) जाहीर झाली आहे. विद्यार्थी याच वेबसाईटवर ती पाहू शकतात आणि डाऊनलोड देखील करु शकतात.

jeemain.nta.nic.in या साईटवर जा. साईटवर 'JEE Main 2021 Result' या ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा. त्यानंतर तुमच्या जेईई मेन्स २०२१ परीक्षेचा निकाल तुम्हाला प्राप्त होईल. त्यानंतर तुम्ही या निकालाची प्रत डाऊनलोड करुन मिळवू शकाल.

एनटीएनं जारी केलेली उत्तरतालिका ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात आणि डाऊनलोड करु शकतात. एनटीएनं 20, 22, 25 आणि 27 जुलै रोजी जेईई मेन परीक्षा तिसऱ्या सत्राची परीक्षा आयोजित केली होती. सुमारे 7.09 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं दिली. NTA ने भारतातील 334 शहरे आणि 828 केंद्रांवर JEE मुख्य परीक्षा घेतली होती.

असा पहा जेईई मेनचा निकाल

स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या.
स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा.
स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT