Octagon Council field of Information Technology sakal
एज्युकेशन जॉब्स

Information Technology : माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अष्टप्रधान मंडळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात अष्टप्रधान मंडळ होते.

सकाळ वृत्तसेवा

- प्रशांत लिखिते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात अष्टप्रधान मंडळ होते. अतिशय बुद्धिमान अशा आठ व्यक्तीचा महाराजांनी आपल्या सल्लागार मंडळात स्थान दिले होते. मित्रांनो, आठ प्रकारची तंत्रज्ञाने महिती तंत्रज्ञान उद्योगाच्या जगात खळबळ उडवून देत आहेत. पुढच्या वीस वर्षात, कदाचित पुढच्या १० वर्षांत ही तंत्रज्ञाने कर्मचाऱ्यांसाठी आणि कंपनी मालकांसाठी सुद्धा फार महत्त्वाची ठरणार आहेत.

ही तंत्रज्ञाने म्हणजे

  • इंटरनेट ऑफ थिंग्स

  • आभासी वास्तव आणि संवर्धित वास्तव (Virtual Reality and augmented reality)

  • रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन (Robotic Process Automation)

  • क्लाउड संगणन (Edge Computing)

  • सायबर सुरक्षा

  • क्वांटम संगणन (Quatntum Computing)

  • ब्लॉकचेन

  • फाईव्ह जी ( ५G)

इंटरनेट ऑफ थिंग्स

एकदा ऑफिसला जाण्यास सकाळी उशीर झाला व घाई सुरू झाली, पटापट कामे आवरण्यासाठी मी कामाला लागलो. तसे हे माझा नेहमीचच, रात्री उशिरा झोपणार आणि सकाळी उशिरा उठणार. सगळे अपूर्ण आवरा-आवर करून मी गाडी घेऊन ऑफिसला निघून गेलो. तेव्हा अचानक रस्त्यात आठवले, की मी घर लॉक करायलाच विसरलो.

हा किस्सा प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी घडत असतो, पण काय करणार या धावपळीच्या जगात थोडे मागे पुढे चालणारच. पण कधीकधी असा थोडेपणा खूप महागात पडतो, चोरी होऊ शकते, घाईघाईत अपघात होऊ शकतो. पण याला पर्याय आहे. तो म्हणजे IOT, इंटरनेट ऑफ द थिंग्स.

इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे ‘वास्तुजाल’. घरातील सर्व वस्तू म्हणजे घराच्या गेटपासून ते फ्रिजपर्यंत, कारपासून टीव्हीपर्यंत सर्व वस्तू इंटरनेटच्या साह्याने आपल्या मोबाईल सोबत जोडणे. म्हणजे सर्व काही आपल्या हातात. हो जे वाचत आहात ते खरे आहे, मोबाईलवरून आपण आपले घर आपण लॉक करू शकतो, टीव्ही सुरू किंवा बंद करू शकतो, कार लॉक करू शकतो.

‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चे आपल्या दैनंदिन जीवनात उद्योग विश्वात खूप सारे फायदे आहेत. स्मार्ट वॉच ही याचीच काही उदाहरणे. स्मार्ट होम्सअंतर्गत येणाऱ्या घरातल्या खूप साऱ्या सोयीसुविधा, जसे की तुम्ही उठण्यापूर्वीच सुरू झालेला गिझर, संध्याकाळ होताच स्वत:हून लागणारे दिवे, दूध संपले आहे हे बघून ते स्वत:च ऑर्डर करणारे फ्रिज आदी ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’मुळे शक्य आहेत. आता दैनंदिन जीवनातील सर्व गोष्टी स्मार्ट होत आहे, हे याचे उत्तम उदाहरण आहे.

आभासी वास्तव आणि संवर्धित वास्तव

ऑगमेंटेड रिॲलिटी (AR) हा वास्तविक जगातील चमत्कार आहे . क्रिकेट मॅचमध्ये गोलंदाज गोलंदाजी करायला त्याच्या रन अपसाठी तयार होतो आणि आपण टीव्हीवर बघतो, की स्पॉन्सर असलेल्या एखाद्या कंपनीच्या रंगीत लोगो वरून धावत जाऊन तो बॉल टाकतो. मॅच स्टेडिअममध्ये पाहताना आपल्याला रन अप गवताळच दिसतो.

प्रत्यक्षात असा लोगो रन अपच्या लाईनमध्ये नसतो. ही किमया आभासी वास्तव आणि संवर्धित वास्तवामुळे घडते. गोलंदाज चेंडू फेकण्यासाठी धावत येताना लाखो प्रेक्षकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. या वेळेस स्पॉन्सरचा लोगो दिसला, तर तो लाखो प्रेक्षक सुद्धा पाहणार. म्हणून करोडो रुपये खर्च करायला स्पॉन्सर कंपनी तयार असते. खूप जास्त पैशाचा खेळ ऑगमेंटेड रिॲलिटीमध्ये होऊ शकतो. नजीकच्या भविष्यात ऑगमेंटेड रिॲलिटी हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातला नक्कीच महत्त्वाचा खेळाडू होणार.

रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन

रोबोटिकची व्याख्या म्हणजे मानवी कृतीची नक्कल करण्याची क्षमता असलेली एक यंत्र संस्था. ऑटोमेशन म्हणजे असे कार्य जे मानवी मदतीशिवाय आपोआप घडते. उत्पादकता काही पटींनी वाढवून मानवी शरीराच्या मर्यादांच्या पलीकडील कामे अचूक करून घेण्याची किमया रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशनमुळे घडते.

आज मनुष्य प्राणी करत असलेली अनेक कामे रोबो किंवा यंत्र मानवांकडून भविष्यात करून घेण्यात येतील. काही वर्षांनी विमान प्रवासात आपल्याला चहा, कॉफी देणारी व्यक्ती हवाई सुंदरी नसेल, तर एक सुबक डिझाईन केलेली यंत्र मानव असू शकते किंवा घरात स्वयंपाक करणारी स्वयंपाकीण सुद्धा यंत्रमानव असू शकते. घरात झाडण्या-पुसण्याचे काम करणाऱ्या यंत्रमानवांचे अनेक ब्रँड आजच मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

क्लाऊड संगणन ( Cloud Computing )

संगणकीय उपकरणे आणि प्रणालीचा एकत्रित वापर करून एखादी सेवा इंटरनेट नेटवर्कवरून उपलब्ध करून देणे यालाच शास्त्रीय भाषेत क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणतात.

आपण साठवत असलेली माहिती, तसेच आपण एकमेकांना फोन करून सांगणे, माहिती शेअर करणे, गाणी ऐकणे, व्हिडियो स्ट्रीमिंग पाहणे ही सर्व कामे नकळतपणे ज्या मोबाईल उपकरण किंवा संगणकाद्वारे आपण करत आहोत, ती क्लाऊड कॉम्प्युटिंगचा एक अविभाज्य भाग आज बनलाय.

येणार दशक क्लाऊड कॉम्प्युटिंगचे असणार असून, या क्षेत्रात ५० कोटी डॉलरपेक्षा अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. यातून आपल्याला कोणत्याही डिव्हाईसद्वारे किंवा जे उपकरण इंटरनेटला जोडले गेलेय त्यावरून कॉम्प्युटर फाइल्स, महिती, मोबाईल्स अॅप्स अगदी सहजरित्या हाताळता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT