Online Admission Sakal media
एज्युकेशन जॉब्स

तांत्रिक प्रवेशासाठी (टीईएस-४७) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

भारतीय सैन्यदलाने तांत्रिक प्रवेश प्रक्रियेसाठी (टीईएस-४७) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रवेश प्रक्रिया केवळ मुलांसाठी असून उमेदवारांना येत्या २३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

भारतीय सैन्यदलाने तांत्रिक प्रवेश प्रक्रियेसाठी (टीईएस-४७) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रवेश प्रक्रिया केवळ मुलांसाठी असून उमेदवारांना येत्या २३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

पुणे - भारतीय सैन्यदलाने तांत्रिक प्रवेश प्रक्रियेसाठी (टीईएस-४७) (TES-47) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Online Form Process) सुरू केली आहे. ही प्रवेश प्रक्रिया केवळ मुलांसाठी असून उमेदवारांना (Candidate) येत्या २३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या तसेच जेईई मेन्सची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेअंतर्गत अर्ज भरात येणार आहे. यासाठी उमेदवारांचे बारावीमध्ये गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या तिन्ही विषयांमध्ये एकूण ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण असणे आवश्‍यक आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये लेखी परिक्षा नसून उमेदवारांना थेट ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती’ (एसएसबी) देता येणार आहे.

टीईएससाठी उमेदवारांची वयोमर्यादा साडेसोळा ते साडे एकोणीस अशी ठेवण्यात आली आहे. ही प्रक्रिया जुलै २०२२ च्या अभ्यासक्रमासाठी असून यामध्ये एकूण ९० पदे जागा ठेवण्यात आल्या आहेत. परंतु यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर उमेदवार सैन्यदलात कायम स्वरूपी आयोगांतर्गत (पर्मनंट कमिशन) अधिकारी म्हणून काम करतील.

संबंधित प्रक्रियेयाबाबतची माहिती सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित माहिती किंवा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेत स्थळाचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT