Slary Satisfaction esakal
एज्युकेशन जॉब्स

Slary Satisfaction : फक्त तुम्ही आम्हीच नाही तर जगातील ७०% लोक आपल्या पगारावर नाखुश, वाचा रिपोर्ट

आपल्या सोबत अन्याय होत असल्याची जाणीव ही त्यांना आपल्या बॉसविषयी वाटत असलेल्या अविश्वासामुळे आहे.

सकाळ डिजिटल टीम

Only 32% Employees are Satisfied With their Sallery : संपूर्ण जगभरात ३२ टक्के लोक आपल्या पगाराने खूश असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. गार्टनर इंक या कंसल्टिंग फर्मने केलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आलं आहे की, आपल्या सोबत अन्याय होत असल्याची जाणीव ही त्यांना आपल्या बॉसविषयी वाटत असलेल्या अविश्वासामुळे आहे असंही त्यात म्हटलं आहे.

हे सर्वेक्षण विविध क्षेत्रातील ३५०० कर्मचाऱ्यांशी बोलून करण्यात आला आहे. या अविश्वासामागे त्रासदायक कल्चर, सर्वसमावेशकतेची कमतरता, काम आणि वैयक्तीक आयुष्य यात समतोल नसणे ही कारणं आहेत. या सर्वेक्षणाचा मुख्य हेतू होता की, कोविडनंतर राजीनामे देण्याचं प्रमाण का वाढलं आहे हे शोधणं.

आधीची नोकरी सोडून दूसरी नोकरी करण्यात सर्वात मोठा भाग हा पगाराचा होता असं यातून समोर आलं आहे. या सर्वेक्षणात जवळपास सर्वच प्रमुख कंपन्यांचा समावेश होता.

सर्वेक्षणाच्या निष्कर्षाविषयी बोलताना गार्टनर मानव संसाधन प्रॅक्टिसमधील वरिष्ठ प्राचार्य, टोनी ग्वाडाग्नी, म्हणाले जेव्हा मालकावर कर्मचाऱ्याचा पूर्ण विश्वास नसतो तेव्हा त्याच्या मनात पगार वाजवी किंवा न्याय नाही असा विचार घोळत राहतो.

सर्वेक्षणात असंही म्हटलं आहे की, बऱ्याचदा पगाराची अपेक्षा वासतवाला धरून नसते. अधिकृत डेटा लक्षात घेता असे दिसते की, बऱ्याच कंपन्या पगाराची तफावत कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वेक्षणानुसार, २०२२ मधील परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी १० पैकी आठ संस्थांनी वार्षिक वेतन इक्विटी ऑडिट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT