India Post Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

पोस्टात परीक्षा न देता नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 'इतका' मिळणार पगार

सकाळ डिजिटल टीम

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

India Post Recruitment 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभाग (Indian Postal Department), महाराष्ट्रनं भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. या भरतीअंतर्गत मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायर मॅनसह इतर पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 9 पदांची भरती करण्यात येणार असून भरतीसाठी इच्छुक उमेदवार 9 मे 2022 पर्यंत अर्ज करू शकतील.

रिक्त पदांची संख्या

  • मेकॅनिक : 5 पदं

  • इलेक्ट्रिशियन : 2 पदं

  • टायर मॅन : 1 पोस्ट

  • लोहार : 1 पद

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवारांनी सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेतील संबंधित विभागामधील प्रमाणपत्रासह आठवी उत्तीर्ण किंवा संबंधित विभागामध्ये एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. मेकॅनिक पदासाठी उमेदवाराकडं अवजड वाहनांसाठीचा वैध ड्रायव्हिंग परवाना असणं गरजेचा आहे.

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचं वय 18 ते 30 वर्षे या दरम्यान असावं.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड पात्रता आणि स्पर्धात्मक ट्रेड चाचणीच्या आधारे केली जाईल.

पगार : या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 19,900 रुपये वेतन दिलं जाणार आहे.

अर्जाची प्रक्रिया : या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी, उमेदवारांनी 9 मे 2022 पर्यंत आपला अर्ज 'वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सर्व्हिस, 134-A, सुदाम कालू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- 400018' या पत्त्यावर पाठवावा. दरम्यान, अधिक माहितीसाठी उमेदवार indiapost.gov.in या वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात वाढ सुरुच, चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

NVS Recruitment 2025: नोकरीची सुवर्णसंधी! शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी मेगा भरती सुरू; अर्जाची शेवटची तारीख आत्ताच जाणून घ्या!

बापरे! सूरजच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकर थेट रुग्णालयात? फोटो शेअर करत म्हणाली...

Kolhapur Construction Worker : कागलमध्ये ३० हजारांवर बांधकाम कामगार! फुगलेली नोंदणी उघड प्रतिनिधींचा पारदर्शकतेसाठी आवाज बुलंद

Satara Politics: देगाव एमआयडीसी आमदार शशिकांत शिंदेंमुळेच गेली : मंत्री शिवेंद्रराजेंचा घणाघात; नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT